Nusrat-Jahan

चार दशकांमध्ये पहिल्यांचा जीडीपीची(gdp) इतक्या मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्याने विरोधकांनी मोदी|(modi) सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. मोदी सरकारच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था(economy) बिकट झाली असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. तृणमुल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ(nusrat jahan) यांनीही जीडीपीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

जीडीपीची आकडेवारी आल्यानंतर सीमेवर चिनी सैन्याने घुसखोरी केल्याची बातमी समोर आली. चीनच्या कुरापती सुरु असताना केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा आणि भारतीयांच्या गोपनीयतेसाठी धोकादायक असलेल्या चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. पब्जीसकट ११८ चिनी अॅप्सवप भारतात बंदी घालण्यात आली आहे. यावर नुसरत जहाँ यांनी ट्विट करुन टीका केली आहे.

खासदार नुसरत जहाँ यांनी आपल्या ट्विटमध्ये मोदींवर निशाणा साधताना असे म्हटले आहे की, मोदी बाबू, जीडीपी बेकाबू!. आता ना पब्जी पुनरुज्जीवित होणार आहे ना अर्थव्यवस्था. नरेंद्र मोदीजी आम्ही काय करायचं ?