कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा विषय ‘त्या’ बैठकीत निघाला अन् त्यावर बोलताना मोदींना अश्रू झाले अनावर, पाहा VIDEO

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधील डॉक्टर, पॅरामेडिकल कर्मचारी आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांबद्दल बोलताना मोदींना अश्रू अनावर(Modi Gets Emotional) झाले.

    देशात एकीकडे रुग्णसंख्या कमी होत असताना रोज चार हजारांहून अधिक कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यांसोबत बैठका घेत आहेत. या बैठकीमध्ये ते उपाययोजनांची माहिती घेत आहेत. दरम्यान शुक्रवारी नरेंद्र मोदी एका बैठकीत बोलत होते. यावेळी कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा उल्लेख करताना ते भावूक(Modi Gets Emotional) झाले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधील डॉक्टर, पॅरामेडिकल कर्मचारी आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांबद्दल बोलताना मोदींना अश्रू अनावर झाले.

    “या व्हायरसने आपल्या अनेक जवळच्या व्यक्तींना हिरावून घेतलं आहे. मी त्यांच्याबद्दल नम्र आदर व्यक्त करतो आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त करतो,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं. हे सगळं बोलत असताना त्यांना रडू येऊ लागले.