आर्थिक संकटांमुळे मोदी सरकार अतिरिक्त नोटा छापणार?; निर्मला सितारामन म्हणाल्या की…

आर्थिक संकटावर मात करण्यासाठी नोटा छापण्याची काही योजना आहे का? असा प्रश्न विचारल्यावर कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी नोटा छपाई करण्याची कोणतीही योजना सरकारनं आखलेली नाही, अशी माहिती केंद्रीय मंत्री सीतारामन यांनी संसदेत दिली.

    नवी दिल्ली : जगभरात कोरोनाच्या महामारीनं डोकं वर काढलेलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक नागरिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झालं आहे. या काळात अनेकांना आर्थिक संकटांना तोंड द्यावं लागलं. अशातच कोरोनामुळं उद्भवलेल्या आर्थिक संकाटाविषयी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    सीतारमन नेमकं काय म्हणाल्या?

    आर्थिक संकटावर मात करण्यासाठी नोटा छापण्याची काही योजना आहे का? असा प्रश्न विचारल्यावर कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी नोटा छपाई करण्याची कोणतीही योजना सरकारनं आखलेली नाही, अशी माहिती केंद्रीय मंत्री सीतारामन यांनी संसदेत दिली. देशाचा पाया मजबूत असून, टाळेबंदीनंतर अर्थव्यवस्थेत सुधारणा होत आहे. आत्मनिर्भर भारत मिशनमुळे 2020-2021 च्या दुसऱ्या वर्षार्धात अर्थव्यवस्था मजबुतीनं सुधारणेच्या मार्गावर वाटचाल करीत आहे, असंही सीतारामन यांनी म्हटलं.

    दरम्यान, कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू कमी होत चालली आहे. मात्र तरीही कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. त्यामुळे लसीकरणावर भर दिला जात असल्याचं दिसून येत आहे.