भारतातील पहिल्या सी प्लेन सेवेचा आज शुभारंभ; जाणून घ्या कसा आहे प्रकल्प

लोह पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशातल्या पहिल्या सी प्लेन सेवेचा शुभारंभ करण्यात आला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेवेचे उदघाटन करण्यात आले. उद्घाटनाच्या नंतर पंतप्रधानांनी स्वत: सी प्लेनने केवडिया ते अहमदाबाद असा प्रवास केला.

अहमदाबाद. लोह पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशातल्या पहिल्या सी प्लेन सेवेचा शुभारंभ करण्यात आला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेवेचे उदघाटन करण्यात आले. उद्घाटनाच्या नंतर पंतप्रधानांनी स्वत: सी प्लेनने केवडिया ते अहमदाबाद असा प्रवास केला.

सर्वात पहिली सीप्ले न सेवा

केवडिया ते अहमदाबाद सी-प्लेन सेवा ही भारताची पहिली सी-प्लेन सेवा आहे. जी अहमदाबादच्या साबरमती रिपरफ्रंटला नर्मदा जिल्ह्याच्या केवडीया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीला जोडते. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१७ साली गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शेवटच्या दिवशी सी-प्लेनने साबरमती नदीच्या मेहसाणा जिल्ह्याच्या धरोई बांधापर्यंत प्रवास केला होता.

…म्हणून आहे खास

ही सी प्लेन पाणी आणि जमीन दोन्ही जागांवरुन उड्डाण घेऊ शकते. तसेच जमीन आणि पाणी दोन्ही जागांवर लॅंड होऊ शकते. सी-प्लेनच्या उड्डाणासाठी ३०० मीटरचा रनवे गरजेचा आहे. उड्डाणासाठी कोणत्याही जलाशयाचा हवाई पट्ट्यावरुन उड्डाण भरु शकता. या सी प्लेनमधून एकावेळेस १९ जण प्रवास करु शकतात.