मोदींनी पहिल्याच बैठकीत उपस्थित केला कोरोनाचा मुद्दा, म्हणाले…

मागील काही दिवसांमध्ये अनेक ठिकाणी लोक मास्क न वापरता, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न करता गर्दी करत असल्याचे व्हिडीओ आणि फोटो समोर येत असल्याचा दाखला देत मोदींनी हा इशारा दिला.

    कोरोनाविरुद्धच्या लढ्यात कोणत्याही प्रकारचा बेजबाबदारपणा सहन केला जाणार नाही असं पंतप्रधान मोदींनी गुरुवारी घेतलेल्या नव्या मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीमध्ये स्पष्ट केलं आहे.  मास्क न घालता फिरणे याबद्दल आपल्या सर्वांच्याच मनात भीती असायला हवी, असं म्हणताच मोदींनी अप्रत्यक्षपणे मास्क न घालता लोकांनी घराबाहेर पडू नये असं म्हटलं आहे.

    मागील काही दिवसांमध्ये अनेक ठिकाणी लोक मास्क न वापरता, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न करता गर्दी करत असल्याचे व्हिडीओ आणि फोटो समोर येत असल्याचा दाखला देत मोदींनी हा इशारा दिला.

    देशातील अनेक भागांमधील लोक कोरोना प्रोटोकॉल्स आणि नियमांचे पालन करत नसल्याबद्दल मोदींनी नाराजी व्यक्त केल्याचं सांगितलं. इतकचं नाही तर मोदींनी ही अशी मास्क न घालता, सोशल डिस्टन्सिंग न पाळता फिरणाऱ्या गर्दीची दृष्य चांगली नसल्याचंही म्हटलं आहे.