…तर निवडणुकांमध्ये पुन्हा मोदीच सत्तेत येणार ; मेहुल चोक्सीचा दावा

मात्र मोदींवर पीएचडी करणाऱ्या गुजरातमधील मेहुल चोक्सी या व्यक्तीने, सध्याच्या परिस्थितीमध्ये मोदींची लोकप्रियता कमी झाली असली तरी आज सुद्धा अनेकांच्या हृदयामध्ये मोदींना अढळ स्थान आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये पुन्हा मोदीच सत्तेत येतील, असा विश्वास व्यक्त केलाय.

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निर्माण झालेला औषध तुटवडा, ऑक्सजिन तुटवडा आणि बेड्सच्या तुटवड्यासाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप राज्यांकडून केला जात आहे. त्यामुळेच या दुसऱ्या लाटेत पंतप्रधान मोदींची लोकप्रियता कमी झाल्याचं बोललं जात आहे.

    मात्र मोदींवर पीएचडी करणाऱ्या गुजरातमधील मेहुल चोक्सी या व्यक्तीने, सध्याच्या परिस्थितीमध्ये मोदींची लोकप्रियता कमी झाली असली तरी आज सुद्धा अनेकांच्या हृदयामध्ये मोदींना अढळ स्थान आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये पुन्हा मोदीच सत्तेत येतील, असा विश्वास व्यक्त केलाय.

    सूरतमध्ये राहणाऱ्या मेहुल चोक्सीने पंतप्रधान मोदींवर पीएचडी केली आहे. लीडरशीप अंडर गव्हर्मेंट- केस स्टडी ऑफ नरेंद्र मोदी, हा विषय घेऊन मेहुल यांनी संशोधन केलं आहे.

    या संसधोनामध्ये त्यांनी साडेचारशे जणांच्या मुलाखती घेतल्या आहेत. यामध्ये सरकारी कर्मचारी, अधिकारी, शेतकरी, विद्यार्थी आणि राजकीय नेत्यांचा सहभाग होता. मेहुल यांनी मोदींच्या नेतृत्वासंदर्भातील काही समान प्रश्न या मुलाखतींमध्ये विचारले होते. या संशोधनादरम्यान मोदींची भाषणं ही जनतेला खूप आकर्षक वाटतात असं मेहुलला दिसून आलं.