kapil sibbal

भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन (GDP) अर्थात जीडीपीचा दर सरलेल्या एप्रिल ते जून तिमाहीत शून्याखाली घसरून २३.९ टक्क्यांनी आक्रसल्याचे, सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीने स्पष्ट झालं. यानंतर मोदी सरकारने (Modi Government) घेतलेल्या आर्थिक धोरणांवर टीका करण्यात येत आहे. जीडीपीचा दर उणेमध्ये आल्यावर विरोधकांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. काँग्रेस नेते कपिल सिब्बल ( Kapil Sibal )यांनी तर मोदींच्या भाषणातील काही जुन्या विधानांची आठवण करून देत प्रश्न विचारला आहे.मोदीजी म्हणजे फक्त भाषण आणि शून्य शासन अशी टीका त्यांनी केली आहे.

 

काय म्हणाले कपिल सिब्बल ?
“मोदीजी, तुम्हाला आठवतंय का? ‘अच्छे दिन’, ‘सबका साथ सबका विकास’, ‘तुम्ही काँग्रेसला साठ वर्षे दिली, मला फक्त साठ महिने द्या’, आता पकोडे तळायची वेळ आली आहे. आणि तेही विकले जाणार नाहीत. फक्त भाषण, शून्य शासन,” असे ट्विट करत कपिल सिब्बल यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

१९९६ पासून तिमाहीगणिक जीडीपीची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात येते. तेव्हापासून पहिल्यांदाच यावेळी  भारताची नकारात्मक आर्थिक विकासाची आकडेवारी आली असून एकूण आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थांमधील ही सर्वात वाईट कामगिरी ठरली आहे.