मोदींच्या टीममध्ये २३ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्रीमंडळात मोठा विस्तार होणार?

केंद्रीय मंत्रीमंडळात पंतप्रधान यांच्यासह ५५ मंत्री आहेत. दरम्यान, आता होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात २३ अजून मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि इतर मंत्र्यांसोबत बैठक घेतली.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या कार्यकाळातील दोन वर्षांतील मंत्रालयाच्या कामाचा लेखाजोखा घेतला. यात त्यांनी २० कॅबिनेट मंत्री आणि स्वतंत्र प्रभार असलेल्या मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला आहे. मोदींनी घेतलेला लेखाजोखा म्हणून मोठे फेरबदल आणि केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची नांदी समजली जाते. या मंत्रीमंडळ विस्तार करताना मोदींच्या टीममध्ये २३ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.

    केंद्रीय मंत्रीमंडळात पंतप्रधान यांच्यासह ५५ मंत्री आहेत. दरम्यान, आता होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात २३ अजून मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि इतर मंत्र्यांसोबत बैठक घेतली.

    या बैठकीला परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक काही कारणांमुळे उपस्थित नव्हते. कॅबिनेट, राज्यमंत्री आणि स्वतंत्र प्रभार असलेल्ल्या मंत्र्यांना नेमून दिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी लेखी रुपरेखा दिली होती. सरकारमधील काही महत्त्वाच्या विभागाच्या कामगिरीचा आढावा घेण्यास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना निमंत्रित करण्यात आलं होतं.