मोहन भागवतांचे हिंदू- मुस्लिम ऐक्य म्हणजे ‘मुंह में राम, बगल में छुरी’ कोण म्हणाले असे

भागवताचे हे विधान म्हणजे 'मुंह में राम, बगल में छुरी' सारखे असल्यासारखे असून देशात लालच दाखवून धमकी देऊन जबरस्तीने धर्मांतर चांगले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

    गाजियाबाद: हिंदू- मुस्लिम एकच असून , भारतात मुस्लीम व्यक्ती राहू शकतनाही असे जरा क कोणता हिंदू म्हणत असेल तर तो हिंदू नाही असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील मुस्लीम राष्ट्रीय मंचने आयोजित केलेल्या ‘हिंदुस्थान फर्स्ट, हिंदुस्थानी बेस्ट’ या कार्यक्रमात भागवत बोलत होते.

    “आपण लोकशाही देशात असल्याने हिंदू किंवा मुस्लीम यांचे वर्चस्व असू शकत नाही असं सांगताना ’सर्व भारतीयांचा ‘डीएनए’ सारखाच आहे. त्यामुळे ‘भारतात इस्लाम धोक्यात’ या भयचक्रात मुस्लीमांनी अडकू नये,” असं आवाहन यावेळी त्यांनी केलं. “झुंडबळीच्या गुन्ह्यत सामील असलेले लोक हिंदू नाहीत, ते हिंदुत्वविरोधी आहेत,” असं प्रतिपादन त्यांनी केलं. मात्र भागवतांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी घेतला आहे,’ भेकडपणा, हिंसा आणि हत्या करणं, हे गोडसेच्या हिंदुत्ववादी विचारांचाच अविभाज्य भाग आहे. मुस्लिमांचे झुंडबळीही याच विचाराचे परिणाम आहेत,” अशी टीका ओवेसी यांनी सरसंघचालकांवर केली.
    ओवीसीनी ट्विटरवर ट्विट करत “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भागवत यांनी सांगितलं की, ‘झुंडबळी घेणारे हिंदुत्वविरोधी आहेत.’ या गुन्हेगारांना गाय आणि म्हैस यांच्यातील फरक कळत असेल, पण हत्या करण्यासाठी जुनैद, अखलाक, पहलू, रकबर, अलिमुद्दीन यांची नावं पुरेशी होती. हा द्वेष हिंदुत्ववादाची देण आहे. या गुन्हेगारांना हिदुत्ववादी सरकारचं पाठबळ आहे,” असेही म्हटले आहे.


    याबरोबरच बहुजन समाजपार्टीच्या अध्यक्षा मायावतींनीही मोहन भागवतांच्या टीकेचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे.

    भागवताचे हे विधान म्हणजे 'मुंह में राम, बगल में छुरी' सारखे असल्यासारखे असून देशात लालच दाखवून धमकी देऊन जबरस्तीने धर्मांतर चांगले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.