Significant changes in climate; Rain warning to Marathwada and Vidarbha for next three days

मान्सूनचे (Monsoon) केरळात (monsoon in kerala) आगमन झाले आहे. पुढील काही दिवसांत मान्सूनचे आगमन गोवा आणि तळकोकणात होणार आहे.

  मुंबई : बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे. मान्सूनचे (Monsoon) केरळात (monsoon in kerala) आगमन झाले आहे. पुढील काही दिवसांत मान्सूनचे आगमन गोवा आणि तळकोकणात होणार आहे.

  अंदमान बेटांवर २१ मे रोजी मान्सून दाखल झाला होता. त्यानंतर बंगालच्या उपसागरात ‘यास’ चक्रीवादळ तयार झाले. त्यामुळे  गुरुवारी मान्सूनने श्रीलंकेसह मालदीव आणि कोमोरीन समुद्राच्या काही भागांत वाटचाल केली.

  मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) १०१ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रासह मध्य भारतात १०६ टक्के पावसाची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे.

  महाराष्ट्राला मात्र मागील काही दिवसांपासून सातत्याने अवकाळी पावसाचा (Pre monsoon rain) तडाखा बसत आहे. आजही राज्यात पूर्व मोसमी पावसाचं सावट घोंघावत आहे. आज दुपारपासूनच पुणे, सातारा, अहमदनगर, रत्नागिरी, जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद लातूर आणि विदर्भात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरणाची नोंद झाली आहे. त्यामुळे याठिकाणी पुढील तीन तासांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

  फास्ट फूडची क्रेज कमी करण्यासाठी आता पालकांनीच पौष्टिक आहाराचा आग्रह धरायला हवा तरच येणारी पिढी सशक्त असेल, असे वाटते का?

  View Results

  Loading ... Loading ...

  मुंबई आणि ठाणे परिसरातही अवकाळी पावसाचे ढग दाटले आहे. याठिकाणी आज पाऊस कोसळणार की नाही? याची स्पष्टता काही तासांतचं येईल. घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. काल मुंबईसह ठाणे परिसरात बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे.