संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला १९ जुलैपासून प्रारंभ

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कोविड नियमावलीचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे. सभागृहात खासदारांसाठी सुरक्षित अंतर राखूनच आसनव्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार लोकसभेच्या ४४४ तर राज्यसभेच्या २१८ खासदारांना कोरोना प्रतिबंधक लसीचा एक तरी डोस घेतलेला आहे.

    नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होणार असल्याचे काल जाहीर करण्यात आले. १७ व्या लोकसभेचे सहावे अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होणार असून ते १३ ऑगस्टपर्यंत चालेल असे लोकसभेच्या वतीने सांगण्यात आले तर राष्ट्रपतींनी १९ जुलै रोजी नवी दिल्ली येथे राज्यसभेचे अधिवेशन बोलवले असून ते १३ ऑगस्टपर्यंत चालेल, असे राज्यसभेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

    संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कोविड नियमावलीचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे. सभागृहात खासदारांसाठी सुरक्षित अंतर राखूनच आसनव्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार लोकसभेच्या ४४४ तर राज्यसभेच्या २१८ खासदारांना कोरोना प्रतिबंधक लसीचा एक तरी डोस घेतलेला आहे. अधिवेशनात १९ बैठका होतील असे राज्यसभेकडून सांगण्यात आले.

    monsoon session of parliament starts from19th july