देशातील Top 11 लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये स्टालिन आघाडीवर, उद्धव ठाकरेंना मिळाले ‘हे’ स्थान – वाचा संपूर्ण माहिती एका क्लिकवर

देशात सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या(Popular Chief Ministers List) यादीत एमके स्टालिन(Stalin) यांनी पहिला क्रमांक लावला आहे. दुसऱ्या क्रमांकावर ओडिशाचे मुख्यमंत्री नविन पटनायक(Navin patnayak) आहेत. तिसऱ्या क्रमांकावर केरळचे मुख्यमंत्री पी विजयन(P Vijayan) तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thakre) हे चौथ्या स्थानावर आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(Mamata banerjee) पाचव्या क्रमांकावर आहेत.

    देशात लोकप्रिय मुख्यमंत्री कोण आहेत हे शोधून काढण्यासाठी नुकतेच एक सर्वेक्षण(Survey To Find Popular Chief Ministers Of India) करण्यात आले. या सर्वेक्षणात सर्वाधिक लोकप्रिय ११(Top 11 Chief Ministers) मुख्यमंत्र्यांमध्ये ९ मुख्यमंत्री हे भाजपची सत्ता नसलेल्या राज्यामधले आहेत. मूड ऑफ द नेशन(Mood Of The Nation Survey) अशा नावाने एका वृत्तवाहिनीने हे सर्वेक्षण केले आहे.

    देशात सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या(Popular Chief Ministers List) यादीत एमके स्टालिन(Stalin) यांनी पहिला क्रमांक लावला आहे. दुसऱ्या क्रमांकावर ओडिशाचे मुख्यमंत्री नविन पटनायक(Navin patnayak) आहेत. तिसऱ्या क्रमांकावर केरळचे मुख्यमंत्री पी विजयन(P Vijayan) तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thakre) हे चौथ्या स्थानावर आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(Mamata banerjee) पाचव्या क्रमांकावर आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, या यादीत भाजपाशासित राज्यातील आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समावेश आहे. दिल्लीचे मुख्ममंत्री अरविंद केजरीवाल यांचंही या यादीत नाव आहे.

    किती टक्के लोकांनी दिली पसंती ?
    तामिळनाडुचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांना ४२ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नविन पटनायक यांना ३८ टक्के लोकांची पसंती आहे. केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांना ३५ टक्के लोकांची पसंती आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना ३१ टक्के लोकांची पसंती असून ते चौथ्या स्थानाववर आहे. ममता बॅनर्जी पाचव्या आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिसवा सहाव्या स्थानावर आहेत. योगी आदित्यनाथ सातव्या आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आठव्या स्थानावर आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवव्या आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन दहाव्या स्थानावर आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल टॉर ११ च्या यादीत शेवटच्या म्हणजे अकराव्या स्थानावर आहेत.