माझा होशील ना…दाजींच्या प्रेमात मेहुणी झाली दिवानी, बहिणीला म्हणाली शोध दुसरा कुंकवाचा धनी

काही दिवसांपूर्वी बहिणीचं तिच्या दाजींसोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याची तिला कुणकुण लागली. तिने याला विरोध करताच तिची सासरहून हकालपट्टी करण्यात आली. यानंतर ती तिच्या वडिलांच्या घरी गेली. पण दाजींवर जीव जडलेल्या याच मेहुणीने पाकबडा येथे भाड्याचे घर घेऊन त्यांच्यासोबत राहू लागली.

  मुरादाबाद : दाजी आणि मेहुणीचं नातं (Relationship) तसं पाहिलं तर खूपच मजेशीर असतं. या नात्यात दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम असते. तर असंही म्हणतात की मेहुणी नसेल तर दाजी बिनकामाचे असतातपण, या नात्याचीही एक मर्यादा असते. पण याच नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. अशीच एक घटना मुरादाबाद (Moradabad) येथून समोर आली आहे. या ठिकाणी दाजींच्या प्रेमात मेहुणी एवढी दिवानी (Sister In Law Love With Brother In Law) झाली की तिने आपल्या मोठ्या बहिणीचे घरही तोडण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या मोठ्या बहिणीच्या वैवाहिक जीवनात बिब्बा घालण्याचं काम करत होती. ही काळीमा फासणारी घटना पूर्ण परिसरात आज एक चर्चेचा विषय ठरली आहे.

  असं आहे प्रकरण

  मझोला ठाणे क्षेत्रातील लाइनच्या पलीकडे राहणाऱ्या एका तरुणीचा विवाह चार वर्षांपूर्वी अमरोहाच्या एका तरुणासोबत झाला आहे, त्यांना एक मूलही आहे. काही दिवसांपूर्वी बहिणीचं तिच्या दाजींसोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याची तिला कुणकुण लागली. तिने याला विरोध करताच तिची सासरहून हकालपट्टी करण्यात आली. यानंतर ती तिच्या वडिलांच्या घरी गेली. पण दाजींवर जीव जडलेल्या याच मेहुणीने पाकबडा येथे भाड्याचे घर घेऊन त्यांच्यासोबत राहू लागली. ही तरुणी एका शिक्षण संस्थेत शिक्षण घेत आहे. अभ्यास करण्याच्या बहाण्याने ती तिच्या दाजींसोबत प्रेमाचे रंग उधळत होती.

  एक दिवस तिच्या वडिलांनी तिला लग्नासाठी ३ मुलांचे फोटो घेऊन तिच्याकडे आले तिने ते सर्व फोटो रिजेक्ट केले. त्यानंतर वडिलांनी तिला घरी नेण्याचा प्रयत्न केला, या कारणामुळे या तरुणीचा राग अनावर झाला आणि तिने त्याच क्षणी उत्तरप्रदेश ११२ वर कॉल केला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तिला घेऊन सर्वजण पोलीस ठाण्यात दाखल झाले. या ठिकाणी पोलिसांच्या उपस्थितीत पंचायत सुरू झाली.

  शोध दुसरा कुंकवाचा धनी

  पोलिसांच्या समोरच मोठ्या बहिणीने छोट्या बहिणीची खूप मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, तिच्यासमोर हात जोडले की, माझ्या संसाराची राखरांगोळी करू नकोस, पण या छोट्या बहिणीने तिच्याच बहिणीला अगदी हसत हसत उत्तर दिले की, मी आता माझ्या मेहुण्यासोबतच लग्न करणार असून तूच शोध दुसरा धनी कुंकवाचा. हे बोलणं ऐकूनच तिचे वडील आणि बहिणीच्या पायाखालची जमीनच सरकली त्यानंतर दोघोही परत आपल्या घरी आले. ही घटना ऐकून नातेवाईकही हैराण झाले आहेत, सोबतच असं निंदनीय कृत्य केल्याप्रकरणी मेहुणी आणि दाजींनाच सर्वजण बोल लावत आहेत.