भारतातील ‘या’ झाडाचे लाकूड आहे सोन्यापेक्षा महाग, एक किलोसाठी मोजावे लागणारे पैसे ऐकाल तर बोबडीच वळेल, जाणून घ्या वैशिष्ट्ये

सोन्यापेक्षाही अधिक मौल्यवान असलेल्या अगरच्या झाडांच्या बागायतीला प्रोत्साहन देण्यासाठी त्रिपुरा सरकारने पुढच्या तीन वर्षांमध्ये या क्षेत्रात दोन हजार कोटी रुपयांचा व्यवसाय मिळवण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

  Agarwood: अत्यंत किमती असलेल्या या झाडांसाठी त्रिपुरा राज्य सरकारने त्रिपुरा अगर धोरण २०२१ चे धोरण आखण्यास सुरुवात केली आहे. तसेच २०२५ पर्यंत या झाडांची संख्या दुप्पट करण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे.

  सोन्यापेक्षाही अधिक मौल्यवान असलेल्या अगरच्या झाडांच्या बागायतीला प्रोत्साहन देण्यासाठी त्रिपुरा सरकारने पुढच्या तीन वर्षांमध्ये या क्षेत्रात दोन हजार कोटी रुपयांचा व्यवसाय मिळवण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्य सरकारने २०२१-२२ या आर्थिक वर्षात ७५ हजार किलो अगर चिप्स आणि १५०० किलो अगर तेलाची निर्यात करण्याचे धोरण आखले आहे.

  मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी या संदर्भात शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अगर तेल आणि चिप्सच्या वाहतुकीसाठी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, मुख्यमंत्री बिप्लब देव यांनी या चर्चेदरम्यान, पंतप्रधानांना अगर झाडाच्या उत्पादन क्षमतेची माहिती दिली. तसेच राज्य सरकारला या क्षेत्रामधून पुढच्या तीन वर्षांत दोन हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाची अपेक्षा असल्याचे सांगितले. दरम्यान, मोदी यांनी या योजनेसाठी सर्व प्रकारची मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.

  सध्या त्रिपुरामध्ये अगरचे ५० हजार वृक्ष आहेत. त्यांनी सांगितले की, राज्य सरकारने त्रिपुरा अगर धोरण २०२१ चा सौदा तयार करणे सुरू केले आहे. तसेच २०२५ पर्यत या वृक्षांची संख्या राज्यात दुप्पट करण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. बिप्लब देव यांनी मोदींकडे सीआयटीईएस नियमांतर्गत लाकूड आणि त्याच्या उत्पादनांच्या निर्यातीसाठी एक कोटा निश्चित करण्याची विनंती केली.

  सन १९९१ मध्ये अगरवूडच्या लाकडाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती. या झाडाचे लाकूड, त्याच्या चिप, पावडर यावर निर्बंध होते. दरम्यान, बिप्लब देव यांनी त्रिपुरामध्ये अगरवूड धोरण जाहीर केल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे.

  अगरच्या लाकडाला वुड्स ऑफ द गॉड म्हटले जाते. अगरवुडच्या खऱ्या लाकडाची किंमत १ लाख डॉलर (७३ लाख ५० हजार रुपये) प्रति किलोग्रॅम एवढी आहे. अगरवूडचे वृक्ष दक्षिणपूर्ण आशियामधील वनांमध्ये आढळतात. मात्र आत या झाडांची संख्या फार कमी झाली आहे. जगभरात अजूनही अगरवुडचा ३२ बिलियन डॉलरचा व्यापार चालतो. वाढत्या मागणीमुळे याचे उत्पादनही वाढले आहे.

  more expensive agarwood tree india gold it costs rs 73 lakhs kg