देशात २४ तासांत ५२ हजारपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद

  • देशात आता देशात ५ लाख ८६ हजार २९८ कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्रालयाकडून देण्यात आली आहे. तसेच देशात आतापर्यंत ३८ हजार ९३८ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

देशात कोरोना विषाणुने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढतच आहे. कोरोना रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित केला आहे. गेल्या २४ तासांत ५२ हजार ०५० कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच ८०३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता १८ लाख ५५ हजार ७४६ वर पोहचली आहे. यामधील १२ लाख ३० हजार ५१० जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची ५० हजारांच्या घरात वाढ होत आहे. 

देशात आता देशात ५ लाख ८६ हजार २९८ कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्रालयाकडून देण्यात आली आहे. तसेच देशात आतापर्यंत ३८ हजार ९३८ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.