गेल्या २४ तासांत देशात ९५ हजारांपेक्षा अधिक रूग्णांची नोंद

देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या ४४ लाख ६५ हजार ८६४ इतकी झाली आहे. तर ९ लाख १९ हजार १८ रूग्णांवर (Active Cases)उपचार सुरू आहेत. तसेच ३४ लाख ७१ हजार ७८४ जणांना उपचारानंतर घरी सोडवण्यात (Discharged) आलं आहे. मात्र, कोरोनामुळे आतापर्यंत ७५ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशात कोरोना रूग्णांच्या (Corona Virus) संख्येत आज पुन्हा एकदा सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसत आहे. देशात गेल्या २४ तासांत ९५ हजार ७३५ इतके नवे कोरोनाबाधित रुग्ण (Single-day spike of 95,735 new) आढळले आहेत. तर देशात १ हजार १७२ रुग्णांच्या मृत्यूची (Deaths )नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा एकूण वाढलेला आकडा पाहता ४४ लाखांच्या पार गेला आहे.

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या ४४ लाख ६५ हजार ८६४ इतकी झाली आहे. तर ९ लाख १९ हजार १८ रूग्णांवर (Active Cases)उपचार सुरू आहेत. तसेच ३४ लाख ७१ हजार ७८४ जणांना उपचारानंतर घरी सोडवण्यात (Discharged) आलं आहे. मात्र, कोरोनामुळे आतापर्यंत ७५ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी २३ हजार ८१६ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. परंतु राज्यात आजपर्यंत तपासण्यात आालेल्या ४८ लाख ८३ हजार नमुन्यांपैकी ९ लाख ६७ हजार ३४९ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहेत, तर आतापर्यंत ६ लाख ८६ हजार ४६२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.