Do you want to keep snakes? It was a dangerous experience; He will not take the name of the snake again

हत्येचा प्रयत्न केल्याच्या दोषामुळे जन्मठेप, विष दिले म्हणून १० वर्षे तर पुरावे नष्ट करण्याच्या दोषासाठी ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विष देणे आणि पुरावे नष्ट करण्याची १७ वर्षांची शिक्षा सुरुवातीला भोगल्यानंतर, मग त्याची जन्मठेपेची शिक्षा सुरु होईल, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.या दोन्ही शिक्षा भोगाव्या लागणार आहेत. या नराधम पतीला ५.८५ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

    कोल्लम : विषारी कोब्रा नागाच्या दंशाने पत्नीचा मृत्यू घडवून आणणाऱ्या पतीला केरळच्या कोर्टाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सूरज एस कुमार असं या नराधम पतीचं नाव असून, पत्नीची हत्या करणे, विष देणे, पुरावे नष्ट करणे आणि हत्येचा प्रयत्न करणे या सर्व गुन्ह्यांत त्याला दोषी ठरवण्यात आले आहे. हे प्रकरण दुर्मीळातील दुर्मीळ ( रेयरेस्ट ऑफ रेयर) असे आहे, मात्र दोषीचे वय जे केवळ २८ वर्षांची आहे, त्याचा विचार करता कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे.

    हत्येचा प्रयत्न केल्याच्या दोषामुळे जन्मठेप, विष दिले म्हणून १० वर्षे तर पुरावे नष्ट करण्याच्या दोषासाठी ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विष देणे आणि पुरावे नष्ट करण्याची १७ वर्षांची शिक्षा सुरुवातीला भोगल्यानंतर, मग त्याची जन्मठेपेची शिक्षा सुरु होईल, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.
    या दोन्ही शिक्षा भोगाव्या लागणार आहेत. या नराधम पतीला ५.८५ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. यापूर्वी कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्यानेच, त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली नाही. गेल्या वर्षी मे महिन्यात पत्नी उथरा झोपलेली असताना, कोब्रा नागाच्या दंशाने त्याने तिचा मृत्यू घडवून आणला होता. तिचे दागिने घेऊन दुसऱ्या महिलेशी लग्न करण्यासाठी त्याने हा भंयकर प्रकार केला.