narayan rane

‘मै नारायण तातू राणे… ईश्वर की शपथ लेता हूँ की…’ असं म्हणत भाजप नेते नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ(Narayan Rane Take Oath) घेतली.

    नवी दिल्ली : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा कॅबिनेट विस्तार अखेर दिल्लीत पार पडत आहे. संध्याकाळी ६ वाजता राष्ट्रपती भवनात नव्या मंत्रिमंडळाचा (#CabinetExpansion2021) शपथविधी सोहळा सुरु झाला आहे.

    ‘मै नारायण तातू राणे… ईश्वर की शपथ लेता हूँ की…’ असं म्हणत भाजप नेते नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ(Narayan Rane Take Oath) घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राणे यांना पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

    आज राष्ट्रपती भवनात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात ४३ मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. कॅबिनेटच्या नव्या विस्तारात २७ ओबीसी आणि २० एससी-एसटी समाजातील चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

    मोदींच्या नवीन कॅबिनेटमध्ये १२ मंत्री दलित समाजातील आहेत. यात प्रत्येक मंत्री विविध SC समाजातील आहे. १२ मंत्र्यांपैकी २ जणांना कॅबिनेट मंत्रिपद देण्याची शक्यता आहे. २७ मंत्री OBC समाजातील आहेत. यात १९ मंत्री असे आहेत जे मागासवर्गीय जातीतून येतात. यादव, कुर्मी, जाट, दर्जी, कोळी अशा समाजाचा समावेश आहे. ओबीसी समाजातील ५ मंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाऊ शकतं तर ८ मंत्री शेड्यूल ट्राईब्स समाजातील आहेत.

    नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात एकूण ४३ जणांचा समावेश करण्यात येणार आहे. हे सर्वजण आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. यामध्ये काही नेते असे आहेत ज्यांच्याकडे राज्यमंत्रिपद होते आणि त्यांना आता कॅबिनेट मंत्रिपद देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.