गांधी जयंतीच्या दिवशी ट्विटरवर ‘नथुराम गोडसे झिंदाबाद’चा ट्रेंड, वरुण गांधींनी सुनावले खडे बोल

शांती आणि अहिंसेच्या मार्गावर चालणाऱ्या महात्मा गांधींची(Gandhi Jayanti 2021) आठवण आजही काढली जाते. मात्र महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी सोशल मीडियावर ‘नथुराम गोडसे झिंदाबाद’(Nathuram Godse Zindabaad)चा ट्रेंड (Latest trend On social Media)दिसून येत आहे.

    देशभरातच नाही तर जगात अनेक ठिकाणी आज म्हणजे २ऑक्टोबरला महात्मा गांधींची जयंती साजरी केली जात आहे. शांती आणि अहिंसेच्या मार्गावर चालणाऱ्या महात्मा गांधींची(Gandhi Jayanti 2021) आठवण आजही काढली जाते. मात्र महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी सोशल मीडियावर ‘नथुराम गोडसे झिंदाबाद’(Nathuram Godse Zindabaad)चा ट्रेंड (Latest trend On social Media)दिसून येत आहे.एकीकडे अनेक जण ‘नथुराम गोडसे झिंदाबाद’असं लिहित आहेत. तर काहीजण या गोष्टीचे समर्थन करत आहेत.

    या मुद्द्यावर आता भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी ‘गोडसे झिंदाबाद’असे ट्विट करणाऱ्या लोकांना खडे बोल सुनावले आहेत. असं ट्विट करणारे लोक बेजबाबदारपणे देशाला लाज आणत आहेत, असं वरुण गांधी यांनी म्हटले आहे. नथुराम गोडसेंनी ३० जानेवारी १९४८ ला नथुराम गोडसेने महात्मा गांधींची हत्या केली होती. गोडसेंना या हत्येसाठी फाशीची शिक्षा झाली होती.


    वरुण गांधी म्हणाले की, “भारत देश नेहमी एक आध्यात्मिक महाशक्ती म्हणून सगळ्यांसमोर आला आहे. मात्र महात्मा गांधींनीच देशातील आध्यात्मिक आधाराला आपल्या अस्तित्वाने व्यक्त केले आणि आपल्याला एक नैतिक अधिकार दिला जो आपली सगळ्यात मोठी ताकद आहे. ‘गोडसे झिंदाबाद’ असं ट्विट करणारे लोक देशासाठी लज्जास्पद कृत्य करत आहेत.”