शेतकरी संघटनांचे आज देशव्यापी आंदोलन, ‘भारत बंद’चा नारा

विविध शेतकरी संघटनांनी आज शुक्रवारी नव्या कृषी विधेयकाच्या विरोधात (Nationwide agitation of farmers organizations today)  भारत बंदचा नारा दिला आहे. प्रामुख्याने या आंदोलनाला पंजाब (Punjab), हरियाणा (Hariyana) आणि कर्नाटकमध्ये (Karnataka) झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही सक्रिया पाठिंबा दिला आहे.

कॉंग्रेसने (Congress) नव्या कृषी विधेयकाच्या (New Farm Bill) विरोधात काल गुरूवारी दोन महिन्यांच्या देशव्यापी आंदोलनाची सुरूवात केली. तसेच विविध शेतकरी संघटनांनी आज शुक्रवारी नव्या कृषी विधेयकाच्या विरोधात (Nationwide agitation of farmers organizations today)  भारत बंदचा नारा दिला आहे. प्रामुख्याने या आंदोलनाला पंजाब (Punjab), हरियाणा (Hariyana) आणि कर्नाटकमध्ये (Karnataka) झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही सक्रिया पाठिंबा दिला आहे. परंतु कॉंग्रेस दिशाभूल करण्याच्या प्रयत्न करत आहे. असा आरोप भाजपने (BJP) केला आहे.

विविध शेतकरी संघटनांची अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, अखिल भारतीय शेतकरी संघटना, भारतीय किसान संघटना, अखिल भारतीय किसान महासंघ या देशव्यापी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. या आंदोलनात ३०हून अधिक शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत.

याशिवाय, सीटू, हिंद मजदूर सभा, नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस आदी १० कामगार संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. तीन शेतीविधेयकांमुळे संसदेत संमत करण्यात आलेल्या हमीभावाबाबत साशंकता निर्माण झाली असून कृषी बाजाराची व्यवस्थाही बंद होण्याचा धोका आहे. केंद्र सरकारची ही धोरणे शेतकरी विरोधी असल्याचा दावा शेतकरी संघटना करत आहेत.