कोविशिल्डची लस घेतलेलाच नवरदेव हवाय; लग्नासाठीच्या जाहिरातीत तरुणीची अट

लग्नासाठी देण्यात आलेल्या या जाहिरातीत चक्क आता लसीकरणाने शिरकाव केल्याचे दिसून आले आहे. एका वधूने तिने घेतलेल्या कोव्हिशिल्ड लसीप्रमाणेच वरही कोव्हिशिल्डची लस घेतलेला असावा अशी अट घातली आहे.

    कोरोनाच्या संसर्गाचा परिणाम केवळ नागरिकांच्या शारीरिक आरोग्यावरच नव्हे तर मानासिक आरोग्यावरही झालेला दिसून येत आहे. अनेकांच्या मनात कोरोनाबद्दल धास्ती निर्माण झाली आहे. विविध कृतीतून ही भीती दिसून येत असते. नुकत्याच लग्नासाठीच्या एका जाहिरात अमुक रंगाचा, ह्याच जातीचा, त्या कुळाचा, एवढ्या उंचीचा, एवढं तेवढं शिक्षण असलेला, पगाराचा, परदेशात सेटल या सारख्या अटी असलेली जाहिरात अनेकदा पाहिली आहे. मात्र लग्नासाठी देण्यात आलेल्या या जाहिरातीत चक्क आता लसीकरणाने शिरकाव केल्याचे दिसून आले आहे. एका वधूने तिने घेतलेल्या कोव्हिशिल्ड लसीप्रमाणेच वरही कोव्हिशिल्डची लस घेतलेला असावा अशी अट घातली आहे.

    अशी आहे जाहिरातीत

    एका इंग्रजी वर्तमान पत्रात ही जाहिरात प्रकाशित केली गेली आहे. सोशल मीडियावर ही जाहिरात बऱ्यापैकी व्हायरल झाली आहे. या जाहिरात वधूपक्षानं दिलेली आहे. त्यात ते असं सांगतात, रोमन कॅथोलिक मुलगी आहे, तिचीवय २४ तर उंची ५.४ असून तिने गणितात M.Sc केले आहे. सेल्फ एम्पलॉईड आहे. आणि कोविशिल्डचे दोन्ही डोस घेतलेले असल्याचेही नमूद केले आहे.

    या वधूला जो नवरा मुलगा हवाय तो कसा हवा तर असा: रोमन कॅथोलिक असावा, त्याचे वय २८ ते३ ० वर्ष हवे . पदवीधर, स्वतंत्रवृत्तीचा, कुणावर अवलंबून नसलेला, धैर्यवान, विनोदी, पुस्तकं वाचणारा असा असावा. याचबरोबर त्याने कोविशिल्डचा डोस घेतलेला असावा आणि तेही दोन्ही अशी अट घालण्यात आली आहे.