असा पाहायचा आज जाहीर होणारा निकाल

NEET परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ही माहिती दिलीय. या निकालासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छादेखील दिल्या आहेत.

नीट (NEETT) परीक्षेचा निकाल आज (शुक्रवारी) जाहीर होणार असल्याची अधिकृत घोषणा (announcment) करण्यात आलीय. शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल (Ramesh Pokhariya Nishank) यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिलीय. १३ सप्टेंबरला देशभरात नीट परीक्षा घेण्यात आली होती. ३८४३ केंद्रांवर (Exam centres) ही परीक्षा झाली. या परीक्षेसाठी १५ लाख ९७ हजार विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. त्यापैकी सुमारे ९० टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिल्याची माहिती आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या वेबसाईटवर हा निकाल जाहीर केला जाईल. Ntaneet.nic.in वर हा निकाल उपलब्ध होणार आहे. रोल नंबर, जन्मतारीख आणि सिक्युरीटी पिन या तपशीलाचा वापर करून विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल प्राप्त करता येतील. या निकालानंतर एनटीए कॅटेगिरीनुसार कट ऑफ स्कोअर जाहीर करण्यात येणार आहे.

कसा पाहायचा निकाल?

  • nic.in वर लॉग इन करा
  • NEET ऍप्लिकेशन नंबर, जन्मतारीख आणि सिक्युरीटी पिन टाकून एंटर करा
  • सर्व माहिती अचूक असेल तर निकाल आपल्या स्क्रीनवर झळकेल
  • निकालाची प्रत डाऊनलोड करा
  • हार्ड कॉपी हवी असेल तर प्रिंटआऊट काढा