नीट युजी परीक्षेचा मार्ग मोकळा, सुप्रीम कोर्टाने जाहीर केला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

सुप्रीम कोर्टानं(Supreme Court Decision About Neet Exam) नीट परीक्षा लांबणीवर टाकली जाणार नाही, असा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. त्यामुळे नीट युजी परीक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे.

    नवी दिल्ली: राष्ट्रीय पात्रता परीक्षा(Neet Exam) म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट यूजी २०२१(NEET UG 2021) परीक्षा १२ सप्टेंबरला होणार आहे. मात्र नीट परीक्षा लांबवीवर टाकण्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, सुप्रीम कोर्टानं(Supreme Court Decision About Neet Exam) नीट परीक्षा लांबणीवर टाकली जाणार नाही, असा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. त्यामुळे नीट युजी परीक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे.

    neet exam

     

    नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेचं प्रवेशपत्र ९ सप्टेंबरला मिळणार आहे. विद्यार्थी परीक्षेच्या तीन दिवस अगोदर प्रवेशपत्र एनटीएच्या वेबसाईटवरुन डाऊनलोड करु शकतात. प्रवेशपत्र जाहीर होण्यासंदर्भातील तारीख जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. नीट यूजी परीक्षेचं प्रवेशपत्रासोबत विद्यार्थ्यांना एक स्वयंघोषणापत्र उपलब्ध होईल. त्या स्वयंघोषणापत्रामध्ये विद्यार्थ्यांना त्यांनी अलीकडील काळात केलेल्या प्रवासाची माहिती भरावी लागणार आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून हा अर्ज भरण्यास सांगण्यात आलं आहे.