पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये ना सिद्धू ना अंबिका सोनी तर चर्चेत आहे ‘ही’ व्यक्ती ; सोनिया गांधीं लवकरच घेणार निर्णय

सुखजिंदर रंधावा हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. ते ६२ वर्षाचे आहेत. पंजाबच्या डेरा बाबा नानक मतदारसंघातून ते विजयी झालेले आहेत. राज्य सरकारमध्ये सध्या ते कॅबिनेत मंत्री आहेत. त्यांच्याकडे सहकार आणि तुरुंग प्रशासन ही खाती आहेत. विश्वसनीय सूत्रांच्या मते रंधावा यांचं नाव पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी फायनल झालं आहे.

    चंदीगड: पंजाबमध्ये राजकीय भूकंप घडला असून सध्या तेथील मुख्यमंत्रीपदाचा पेच काही सुटताना दिसत नाही. नवज्योतसिंग सिद्धू आणि सुनील जाखड यांची नावे मागे पडल्यानंतर अंबिका सोनी यांनीही मुख्यमंत्रीदासाठी नकार दिला आहे. त्यामुळे सुखजिंदरसिंग रंधावा (Sukhjinder Randhawa)यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींकडे याबाबत बैठक सुरू असून कोणत्याही क्षणी नव्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.(Race for the chief minister Of Punjab)

    रंधावा कोण आहेत?

    सुखजिंदर रंधावा (Sukhjinder Randhawa)हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. ते ६२ वर्षाचे आहेत. पंजाबच्या डेरा बाबा नानक मतदारसंघातून ते विजयी झालेले आहेत. राज्य सरकारमध्ये सध्या ते कॅबिनेत मंत्री आहेत. त्यांच्याकडे सहकार आणि तुरुंग प्रशासन ही खाती आहेत. विश्वसनीय सूत्रांच्या मते रंधावा यांचं नाव पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी फायनल झालं आहे. फक्त आज त्यांच्या नावाची घोषणा होणार आहे. रंधावा हे ज्येष्ठ नेते आहेत. सिद्धू यांना मुख्यमंत्रीपद दिल्यानंतरही सिद्धू आणि अमरिंदर सिंग गटाच्या कुरघोडी सुरूच राहू शकतात.

    सिद्धू गटाने जाखड यांना विरोध केल्याने जाखड यांच्याकडे मुख्यमंत्रीद जाखड आणि सिद्धू गटातही तू तू मै मै होऊ शकते. त्यामुळेच रंधावा यांचं नाव फायनल केल्या गेल्याचं सांगितलं जात आहे. रंधावा यांना मुख्यमंत्रीद दिल्यास गटातटाच्या राजकारणाला तिलांजली दिली जाऊ शकते. तसेच दीड वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीत त्याचा काँग्रेसला फटका बसणार नाही, म्हणूनच रंधावा यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी फायनल केल्याचंही सांगितलं जात आहे.