प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

जम्मू काश्मिरसाठी केंद्रद्वारे अधिसूचित नव्या जमीन कायद्याविरोधात मीरवाईज ओमर फारूखच्या नेतृत्वातील हुर्रियत कॉन्फ्रेंसने शनिवारी बंदचे आवाहन केले त्याचा खोऱ्यातील जनजीवनावर विपरित परिणाम झाला. उल्लेखनीय असे की याच आठवड्याच्या प्रारंभी केंद्र सरकारने अनेक कायद्यात दुरुस्ती करून जम्मू काश्मिर बाहेरील लोकांना राज्यात जमीन खरेदीचा मार्ग प्रशस्त केला आहे.

श्रीनगर (Shrinagar). जम्मू काश्मिरसाठी केंद्रद्वारे अधिसूचित नव्या जमीन कायद्याविरोधात मीरवाईज ओमर फारूखच्या नेतृत्वातील हुर्रियत कॉन्फ्रेंसने शनिवारी बंदचे आवाहन केले त्याचा खोऱ्यातील जनजीवनावर विपरित परिणाम झाला. उल्लेखनीय असे की याच आठवड्याच्या प्रारंभी केंद्र सरकारने अनेक कायद्यात दुरुस्ती करून जम्मू काश्मिर बाहेरील लोकांना राज्यात जमीन खरेदीचा मार्ग प्रशस्त केला आहे.

शनिवारच्या बंद दरम्यान श्रीनगरातील अधिकांश दुकाने, पेट्रोल पंप आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने बंदच होती. तथापि काही भागात खासगी कार आणि ऑटोरिक्षा मात्र सुरू होते. दुसरीकडे, बंदचे आवाहन पाहू जाता खोऱ्यात सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली होती.

सरकारवर आरोप
केंद्राद्वारे नवा जमीन खरेदी कायदा अमलात आणल्यानंतर हुर्रियतने खोऱ्यात बंदचे आवाहन केले होते. केंद्र सरकार एकापाठोपाठ एक नवे कायदे लागू करीत असून ते जम्मू काश्मिरच्या जनतेवर थोपवित असल्याचा आरोप हुर्रियत कॉन्फ्रेंसने केला. मंगळवारी जारी केलेल्या अधिसूचनेतून केंद्रने केंद्रशासित प्रदेशातील भूमीसंबंधित जम्मू काश्मिर विकास अधिनियमाच्या परिच्छेद 17 मध्ये राज्याचे स्थानीक निवासी हा शब्द वगळला आहे.