nia raid

दिल्ली: टेरर फंडिंग(terror funding) प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए)(nia raid) बुधवारच्या छाप्यानंतर गुरुवारी पुन्हा श्रीनगर आणि दिल्लीतील ९ ठिकाणी छापे मारले. दहशतवाद्यांना फंडिंग करणाऱ्या एनजीओवर एनआयएने भादंवि कलम१२४ ए नुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.

दिल्ली: टेरर फंडिंग(terror funding) प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए)(nia raid) बुधवारच्या छाप्यानंतर गुरुवारी पुन्हा श्रीनगर आणि दिल्लीतील ९ ठिकाणी छापे मारले. दहशतवाद्यांना फंडिंग करणाऱ्या एनजीओवर एनआयएने भादंवि कलम१२४ ए नुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. यासोबतच एनआयएने या प्रकरणी युएपीएअंतर्गतही प्रकरण नोंदविले आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, एनआयएने ज्या एनजीओवर छापा टाकला त्यास पाकिस्तान आणि युरोपियन देशांतून पैसा प्राप्त झाला आहे.

गुरुवारी एनआयएच्या पथकांनी श्रीनगर (जम्मू-काश्मीर) मधील ९ आणि दिल्लीतील एका ठिकाणी छापे टाकले.एनआयएने सकाळी मोहम्मद जफर अकबर बट यांच्या घरी छापा टाकला. जफर-बट हे जम्मू काश्मिर सॉल्व्हेशन मूव्हमेंटचे अध्यक्ष असून ही संघटना फुटीरवादी म्हणून ओळखली जाते. फुटीरवादी संघटनेपूर्वी ते हिज्बुल मुजाहिद्दीनचे कमांडर होते आणि सन २००० मध्ये केंद्र सरकारसोबतच्या चर्चेत त्यांनी भागही घेतला होता. त्यानंतर सलाउद्दीनसोबत मतभेद झाल्यानंतर त्यांनी बंदूक सोडली आणि राजकारणीत सक्रिय झाले होते.

गुरुवारच्या छाप्यांमध्ये दिल्ली अल्पसंख्यंक आयोगाचे माजी अध्यक्ष जफर-उल-इस्लाम खान यांच्या अध्यक्षतेखालील चॅरिटी अलायन्स, अनंतनागमधील मानव कल्याण फाऊंडेशन, जम्मू-काश्मीर याटेम फाउंडेशन, जम्मू-काश्मीर व्हॉईस ऑफ पीडित, आणि शबीर अहमद बाबा यांच्या नेतृत्वात फलाह यांचा समावेश आहे. एनआयएच्या पथकाने काश्मीरमधील सकाळी वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी छापा टाकला आहे. यामध्ये श्रीनगर आणि बडगाम भागांचा समावेश आहे. दहशतवादी निधी प्रकरणात छापे टाकण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एनआयए पथकाने सोनवार येथील ग्रेटर काश्मीर ट्रस्ट, खुर्रम परवेझ या स्थानिक वृत्तपत्र आणि एचबी हाऊस बोट नेहरू पार्क परिसरातील अथ्रोट या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यालय व निवासस्थानावर छापे टाकले.