oath ceremony of 9 judges

. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी एकाचवेळी नऊ न्यायाधीशांना(Nine Judges Take Oath At A time) आज शपथ दिली. या ९ न्यायाधीशांमध्ये महिला न्यायाधीशांची संख्या ३ इतकी आहे.

    दिल्लीत(Delhi) सर्वोच्च न्यायालयाच्या(Court) अतिरिक्त भवन परिसरातील सभागृहात एक मोठा शपथविधी सोहळा(Oath taking Ceremony) आज पार पडला. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी एकाचवेळी नऊ न्यायाधीशांना(Nine Judges Take Oath At A time) आज शपथ दिली. या ९ न्यायाधीशांमध्ये महिला न्यायाधीशांची संख्या ३ इतकी आहे. सरन्यायाधीश रमण यांनी नऊ न्यायाधीशांना शपथ दिली.  श्रीनिवास ओका, विक्रम नाथ, जितेंद्र कुमार माहेश्वरी, हिमा कोहली, बीवी नागरत्ना, सीटी रविकुमार, एमएम सुंदरेश, बेला एम त्रिवेदी आणि पीएस नरसिम्हा यांनी आज न्यायाधीशांची शपथ घेतली.

    आज नऊ न्यायाधीशांनी शपथ दिल्यानंतर सरन्यायाधीशांसह न्यायाधीशांची संख्या ३३ झाली आहे. तसेच स्वीकृत संख्या ३४ झाली आहे.२०१९ नंतर एकाही न्यायाधीशाची नियुक्ती झाली नव्हती. मात्र सरन्यायाधीशांच्या १७ ऑगस्टच्या बैठकीत ९ नवीन न्यायाधीशांच्या नावाला मंजुरी मिळाली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने नऊ नावांची शिफारस पाठवली होती.

    दरम्यान न्यायाधीश नागरत्ना या सप्टेंबर २०२७ मध्ये पहिल्या महिला सरन्यायाधीश बनण्याची शक्यता आहे. जस्टीस नागरत्ना या माजी सरन्यायाधीश ई एस वेंकटरमैया यांची मुलगी आहे. ज्यांना पदोन्नती मिळाल्यास २०२७ मध्ये देशाच्या पहिली महिला सरन्यायाधीश बनू शकतात. न्यायमूर्ती नागरत्न व्यतिरिक्त, पाच सदस्यीय कॉलेजियमने निवडलेल्या इतर दोन महिला न्यायाधीशांमध्ये तेलंगणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती हिमा कोहली आणि गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बेला त्रिवेदी यांचा समावेश आहे.