जवानांसाठी नॉन बुलेटप्रूफ ट्रक आणि मोदींसाठी ८४०० कोटींचे विमान ? राहुल गांधींचा सवाल

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर (Modi Government) टीका करण्यात सातत्य राखत भारतीय सीमेवर तैनात जवानांचा मुद्दाही उचलून धरला आहे. यावेळी, राहुल गांधी यांनी जवानांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Video Share On Social Media) शेअर करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. पंतप्रधान मोदींनी ८४०० कोटींच विमान खरेदी केल आहे. त्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर (Modi Government) टीका करण्यात सातत्य राखत भारतीय सीमेवर तैनात जवानांचा मुद्दाही उचलून धरला आहे. यावेळी, राहुल गांधी यांनी जवानांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Video Share On Social Media) शेअर करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. पंतप्रधान मोदींनी ८४०० कोटींच विमान खरेदी केल आहे. त्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला आहे. जवानांसाठी नॉन बुलेटप्रूफ ट्रक (Non-bulletproof trucks for soldiers) आणि मोदींसाठी ८४०० कोटींचे विमान, असा न्याय का ??? असा थेट सवाल राहुल गांधींनी केला आहे.

यासंदर्भात त्यांनी व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत एका ट्रकमध्ये जवान बसलेले दिसत आहेत. ते एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. यामध्ये एक जवान म्हणताना दिसतोय की, ‘नॉन बुलेटप्रुफ गाड्यांमधून पाठवून आपल्या जीवासोबत खेळलं जातंय’. सोशल मीडियावर जवानांचा व्हायरल झालेल्या हा व्हिडिओवरून राहुल गांधी यांनी मोदी सरकरावर टीकास्त्र सोडलं ‘आपल्या जवानांना नॉन बुलेटप्रुफ ट्रकांमधून शहीद होण्यासाठी पाठवलं जात आहे आणि पंतप्रधानांसाठी ८४०० कोटी रुपयांचं विमान मागवलं जात आहे, हा न्याय आहे का?’ असा सवाल राहुल गांधींनी विचारला आहे.

शेअर केलेला व्हिडिओ :