Nora Fatehi : दोनशे कोटींच्या मॅनी लॉड्रिंग प्रकरणात अडकली नोरा फतेही, ईडी करतेय चौकशी

सुकेश चंद्रशेखर याला याच वर्षी अटक करण्यात आली आहे. तरुंगात बसून बाहेर २०० कोटी रुपयांचे वसुलीचे मोठे रॅकेट त्याने चालविल्याचा त्याच्यावर आरोप आहे. सुकेशने जेलमधून एका उद्योगपतीच्या पत्नीकडे ५० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केल्यानंतर, तुरुंगांत सुकेशच्या कोठडीतून दोन मोबील जप्त करण्यात आले होते.

    नवी दिल्ली : अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडी मनी लाँड्रिंगच्या एका प्रकरणात चौकशी करीत आहे. यात अभिनेत्री नोरा फतेही हिलाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. ईडीच्या कार्यालयात तिची चौकशी करण्यात येते आहे. २०० कोटींच्या मनी लाँडिंग प्रकरणात ही चौकशी सुरु आहे. या चौकशीला सामोरे जाण्य़ासाठी नोरा दिल्लीत पोहचली आहे.

    या प्रकरणात गेल्या महिन्या जॅकलिन फर्नांडियस हिलाही समन्स बजावण्यात आले होते. या प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरशी संबंधित प्रकरणात जॅकलिनची दिल्लीत चार तास चौकशी करण्यात आली होती. साक्षीदार म्हणून तिचा जबाब नोंदवण्यात आला होतो. नोरा फतेही आणि जॅकलिन या दोघीही या प्रकरणात पीडित आहेत. त्यापूर्वीही सुकेश चंद्रशेखरच्या एका प्रकरणात साक्षीदार म्हणून जॅकलिनची सहा तास चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी या प्रकरणात नोरा फतेही हिचेही नाव समोर आले होते. त्यानंतर या प्रकरणात तिचा जबाब नोंदवण्यासाठी तिला बोलविण्यात आले आहे.

    सुकेश चंद्रशेखर आणि लीना पॉल तरुंगात
    सुकेश चंद्रशेखर याला याच वर्षी अटक करण्यात आली आहे. तरुंगात बसून बाहेर २०० कोटी रुपयांचे वसुलीचे मोठे रॅकेट त्याने चालविल्याचा त्याच्यावर आरोप आहे. सुकेशने जेलमधून एका उद्योगपतीच्या पत्नीकडे ५० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केल्यानंतर, तुरुंगांत सुकेशच्या कोठडीतून दोन मोबील जप्त करण्यात आले होते. सुकेशची पत्नी लीना पॉल हीही याच प्रकरणी तुरुंगात आहे.
    नोरा फतोही ही अभिनेत्री असून, ती आत्ताच भूज, द प्राईड ऑफ इंडिया या सिनेमात दिसली होती. याचबरोबर टीव्ही डान्स रिएलिटी शोमध्येही ती सातत्याने सहभागी होत असते. तिची अनेक गाणीही लोकप्रिय आहेत.