आता कॅन्सरचे निदान होणार फक्त २२ रुपयात!

इंडोक्राईन ब्रेस्ट कॅन्सरचे डॉ. गौरव अग्रवाल यांनी सांगितले की, ब्रेस्ट कॅन्सरच्या तपासणीसाठी गामा प्रोब मशीनची गरज असते, जी टिश्यूमध्ये कॅन्सर सेल्सचा शोध लावते. मशीनची किमत १.५० लाख रुपये आहे.

लखनऊ. एखाद्या व्यक्‍तीच्या शरीरात गाठ आहे. ही गाठ कॅन्सरची आहे की नाही, केवळ याची तपासणी करण्यासाठीच लोकांना हॉस्पिटलच्या अनेक चकरा माराव्या लागतात. यासाठी अधिक पैसाही खर्च करावा लागतो. लखनऊ स्थित एसजीपीजीआयचे डॉ. गौरव अग्रवाल यांचे एक संशोधन आता या प्रक्रियेला अधिक सोपे करणार आहे. तसेच किंमतही केवळ २२ रुपये राहील. फ्लोरोसेंट डायच्या मदतीने होणारी ही तपासणी प्रशिक्षणानंतर छोटे रुग्णालयही सहजपणे करू शकतील. यासंबंधात डॉ. अग्रवाल यांचे शोधपत्र ‘वर्ल्ड जर्नळ ऑफ सर्जरी’ च्या ऑक्टोबरच्या अंकात प्रकाशित झाले आहेत. या संशोधनासाठी सीएम योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते त्यांना सन्मानितही करण्यात आले आहे.

इंडोक्राईन ब्रेस्ट कॅन्सरचे डॉ. गौरव अग्रवाल यांनी सांगितले की, ब्रेस्ट कॅन्सरच्या तपासणीसाठी गामा प्रोब मशीनची गरज असते, जी टिश्यूमध्ये कॅन्सर सेल्सचा शोध लावते. मशीनची किमत १.५० लाख रुपये आहे. आम्ही फ्लोरेसेंट डायद्वारे संभावित कॅन्सर सेल्सचा शोध लावण्याचा प्रयत्न केला. आम्ही हे डाय ब्रेस्ट कॅन्सरच्या ट्यूमरमध्ये इंजेक्ट करतो. ब्रेस्ट कॅन्सर जेव्हा पसरतो, तेव्ह लिंफनोड आर्मपिटपर्यंत पोहोचतो. यामध्ये हातावर सूजसुद्धा येते.

असे करते काम

हे डाय इंजेक्ट झाल्यानंतर त्या सेल्सपर्यंत पोहोचते, जेथे कॅन्सर पसरलेला असतो. यानंतर आम्ही चीरा मारून ब्लू लाईट टाकतो . ब्लूलाईटमध्ये हे डाय चमकतात. यामुळे आम्हाला कॅन्सर प्रभावित संभावित भागाचा शोध लागतो . दुसऱ्या तपासणीनंतर आम्ही त्या लिंफनोट काढून टाकतो . डॉ. गौरव यांनी सांगितले की, पूर्वी आम्ही या तपासणीत कमर्शल डायचा प्रयोग करीत होता. जो विदेशातून मागविला जात होता. त्याची किंमत ६००० रुपये प्रति रुग्ण असायची . यानंतर भाभा एटॉमिक सेंटरमधून आम्हाला डाय मिळू लागली . ज्याची किंमत ७०० ते ८०० रुपये प्रति रुग्ण झाली . यानंतर आपली रेडियोफार्मास्यूटिकल डाय बनविली, ज्याचा खर्च ५० रुपये प्रति रुग्ण येऊ लागला.