तेल कंपन्यांवर राजकीय दबाव, ५ राज्यांमधील निवडणुका होईपर्यंत टळली पेट्रोल-डिझेल दरवाढ

पाच राज्यांच्या निवडणुकांच्या (election in 5 states)पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेलची दैनंदिन दरवाढ तूर्त स्थगित(stay on petrol and diesel prize hike) करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, केंद्र सरकारने तेल कंपन्यांना काही दिवसांसाठी पेट्रोल-डिझेल दरवाढ थांबविण्याचे अनौपचारिक निर्देश दिल्याची माहिती सरकारशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

    दिल्ली : पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या(fuel prize hike) मुद्द्यावरून नागरिकांमध्ये असंतोष पसरला असून त्याची जाणीव केंद्रातील मोदी सरकारलाही(modi government) आहे. निवडणुकीत ही नाराजी भाजपाला भोवण्याचीही शक्यताही आहे.

    पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेलची दैनंदिन दरवाढ तूर्त स्थगित(stay on petrol and diesel prize hike) करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, केंद्र सरकारने तेल कंपन्यांना काही दिवसांसाठी पेट्रोल-डिझेल दरवाढ थांबविण्याचे अनौपचारिक निर्देश दिल्याची माहिती सरकारशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

    राजकीय दबावामुळे लगाम

    राजकीय दबावामुळे तेल कंपन्यांनी दैनंदिन करण्यात येणाऱ्या दरवाढीवर लगाम कसला असून तूर्त तरी सामान्य माणसाला दिलासा मिळाला आहे. ज्या पद्धतीने इंधनाची दैनंदिन दरवाढ होत होती त्यामुळे जनतेच्या मनातही सरकाप्रती रोष निर्माण झाला होता. तथापि काही राज्यांनी करात कपात करून जनतेतील असंतोष कमी करण्याचाही प्रयत्न केला परंतु जो कर कमी झाला तो सुद्धा अत्यल्प असल्याची भावना लोकांमध्ये आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजधर्माची आठवण करून देत इंधनाचे दर कमी करण्याबाबत पत्र लिहिले होते.