तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी, राज्यातील सर्वात महाग पेट्रोल कुठे?, जाणून घ्या आजचे दर

पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहे. दररोज सकाळी ६ च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. Goods Return या वेबसाईटने आज पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत.

  मुंबई : देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत काही प्रमाणात घट होताना दिसत आहे. पेट्रोल-डिझेलचे दर हे ९५ रुपयांच्या पुढेच पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहे. दररोज सकाळी ६ च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. Goods Return या वेबसाईटने आज पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत.

  महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल हे नांदेड शहरात पाहायला मिळत आहे. नांदेडमध्ये पेट्रोलचा दर हा ९९.६३ रुपये इतका आहे. त्यापाठोपाठ परभणीत ९९.३३ रुपये किंमतीने पेट्रोलची विक्री होत आहे. त्याशिवाय नांदेडमध्ये डिझेलची विक्री सार्वाधिक दराने होत आहे. नांदेड शहरात डिझेलचा दर ८९.२५ रुपये इतका आहे.

  देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे भाव

  नवी दिल्ली : ९१.१७ रुपये प्रतिलीटर

  मुंबई : ९७,५७ रुपये प्रतिलीटर

  कोलकाता : ९१.३५ रुपये प्रतिलीटर

  चेन्नई : ९३.११ रुपये प्रतिलीटर