corona patients

ही आकडेवारी चुकीच्या पद्धतीने नोंदविण्यात आली आहे. यात अशा कलुषित विचारांचा आधार घेण्यात आलाय, ज्याची माहिती फोनवरुन घेऊन हा अहवाल संकलित करण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांच्या मते, न्यूयॉर्क टाइम्सच्या या अहवालात काहीही तथ्य नाही.

    नवी दिल्ली : आरोग्य मंत्रालय आणि निती आयोगाने गुरुवारी देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची परिस्थिती कथन करणारी आकडेवारी जाहीर केली. पत्रकार परिषदेत सरकारने न्यूयॉर्क टाइम्सच्या त्या अहवालाचाही उल्लेख केला, ज्यात भारतात कोरोनामुळे ४० लाख मृत्यू झाले असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

    निती आयोगाचे सदस्य वीके पॉल यांच्या मते, ही आकडेवारी चुकीच्या पद्धतीने नोंदविण्यात आली आहे. यात अशा कलुषित विचारांचा आधार घेण्यात आलाय, ज्याची माहिती फोनवरुन घेऊन हा अहवाल संकलित करण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांच्या मते, न्यूयॉर्क टाइम्सच्या या अहवालात काहीही तथ्य नाही.

    NYTच्या अहवालावर भारत सरकारचे स्पष्टीकरण

    • डॉ. वीके पॉल यांनी न्ययॉर्क टाइम्सच्या या अहवालाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकूण संसर्गात मृत्यूची आकडेवारी कशाच्या आधारे निश्चित करण्यात आली? आणि यातही ५ जणांनी फोनवर विचारणा करून हा अहवाल तयार केला आहे. कोणत्याही आधाराशिवाय मृत्यू १२ टक्के वाढवून सांगण्यात आले. हीच बाब न्यूयॉर्कच्या बाबतीत लागू करायची झाल्यास याचे काय परिणाम होतील?
    • मे महिन्यात हाच मृत्यूदर त्यांनी १६ हजार सांगितला आणि त्यांना अत्यानंद होतो आहे की त्यांचा मृत्यू दर ०.९७% आहे. जर आपण याचे तीनपट केले तर ५० हजार मृत्यू, जर ६ पट केलं तर ९० हजार मृत्यू आणि १२ पट केलं तर १.७५ लाख एवढे मृत्यू होतात.
    • पण, या ठिकाणी ते आपला फंडा अप्लाय करणार नाहीत, ते या ठिकाणी आपले मृत्यू १६ हजारच सांगणार. या लोकांनी संसर्गासाठी जी आकडेवारी वापरली ती डिसेंबर-जानेवारीतील सीरो सर्व्हेक्षणाची आकडेवारी आहे, जो आज अप्लाय होत नाही.
    • मृत्यूदर कशाच्या आधारे निश्चित केला याची माहिती नाही. आपल्याकडे मृत्यू नोंदणीची मोठी सक्षम यंत्रणा आहे. एका प्रतिष्ठित वृत्तपत्रात अशाप्रकारे अहवाल प्रकाशित करायला नको होता. हे अयोग्य आहे आणि आम्ही याचा स्वीकार करु शकत नाही.

    भारतात कोरोनाचा आजवरचा प्रादुर्भाव

    भारतात आजवर अधिकाधिक २.६९ कोटी लोकं कोरोना बाधित झाली असून ३.०७ लाख लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. देशात आजमितीला २४ लाख, १५ हजार ७६१२ रुग्णांवर उपचार सुरु आहे. गेल्या २४ तासांत २ लाख ११ हजार २७५ नवीन कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. याहून अधिक, म्हणजेच २ लाख ८२ हजार ९२४ रुग्ण बरे झाले आहेत. ३,८४१ जणांचा मृत्यू झाला आहे.

    न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालात काय म्हटलं आहे

    द न्यूयॉर्क टाइम्सने भारतात मृत्यूच्या आकडेवारीचे योग्य अनुमान काढण्यासाठी एक डझनहून अधिक तज्ज्ञांची मदत घेतली. या तज्ज्ञांनी भारतात महामारीची तीन भागांत विभागणी केली- सामान्य स्थिती, खराब स्थिती, अत्यंत खराब स्थिती.

    अत्यंत खराब स्थितीच्या अहवालात संक्रमणाचे वास्तविक आकडेवारी २६ टक्के अधिक संक्रमणाचे अनुमान लावण्यात आले. संक्रमणाने मृत्यूदराचेही अनुमान ०.६०% ठेवण्यात आले. हे अनुमान कोरोनाची दुसरी लाट आणि देशाची ढासळलेली आरोग्य व्यवस्था पाहून लावण्यात आले आहे. या स्थितीत ७० कोटी लोक संक्रमित झाले असल्याची आणि ४२ लाख जणांचा मृत्यू झाल्याचे अनुमान लावण्यात आले.

    on new york times narendra modi government report niti ayog on corona deaths in india