रेल्वे ट्रॅकवर करायला गेला बाइक स्टंट, ट्रेन आली आणि पुढे काय घडलं; पाहा VIDEO

आजकाल प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करू शकतात. यासाठी अनेकदा ते विचित्र कृत्य करताना दिसतात. तर, अनेक तरुण खतरनाक स्टंट करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात. गुजरातमध्येही एक व्यक्ती हाच प्रयत्न करत होता.

    नवी दिल्ली : सोशल मीडिया (Social Media) हे सध्या एक असं माध्यम ठरत आहे, जे रातोरात एखाद्याला प्रसिद्धीझोतात आणत आहे. त्यामुळे, सोशल मीडियावर आपले निरनिराळे व्हिडिओ टाकून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न अनेकजण करताना दिसतात. मात्र, प्रसिद्धी मिळवण्याच्या या प्रयत्नात अनेकदा हे लोक स्वतःच्याच जीवाशी खेळ करतात. असंच एक प्रकरण गुजरातमधून समोर आलं आहे. यात एक व्यक्ती रेल्वे ट्रॅकवर बाईक स्टंट (Bike Stunt) करताना दिसत आहे. मात्र, अचानक ट्रेन आल्यानंतर जे झालं, ते पाहून लोकही हैराण झाले आहेत.

    आपल्या सर्वांना माहिती आहे, की आजकाल प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करू शकतात. यासाठी अनेकदा ते विचित्र कृत्य करताना दिसतात. तर, अनेक तरुण खतरनाक स्टंट करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात. गुजरातमध्येही एक व्यक्ती हाच प्रयत्न करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण जामनगर रेल्वे ट्रॅकवर फोटोग्राफी करण्यासाठी गेला होता. साढिया पुलाजवळ त्याने रेल्वे ट्रॅकवर आपली गाडी उभी केली आणि व्हिडिओ बनवू लागला. इतक्यात अचानक ट्रेन आली. या घाईत युवक स्वतः ट्रॅकपासून दूर झाला मात्र त्याला स्वतःची गाडी तिथून हटवण्याचा वेळ मिळाला नाही. यानंतर याचा परिणाम असा झाला की ही गाडी ट्रेनखाली आली.

    सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Video Viral on Social Media) झाला. हा व्हिडिओ पाहून लोक हैराण झाले असून अनेकांनी यातील युवकाला सुनावण्यास आणि त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी हा व्हिडिओ शेअरही केला आहे. अनेक लोक हा व्हिडिओ पाहून मजा घेत आहेत तर अनेकजण या युवकावर टीका करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

    on railway track boy was shooting bike stunt and suddenly railway passing through track video viral social media