file photo
file photo

पोलिसांनी सांगितले की, संशयित दहशतवाद्यांनी चित्रगाममध्ये एका व्यक्तीवर गोळीबार केला. त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. प्राथमिक अहवालांनुसार, जखमी व्यक्तीचे नाव जमीर अहमद आहे, आणि ते व्यवसायाने दुकानदार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, हल्लेखोरांना पकडण्यासाठी संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरु आहे.

    जम्मू -काश्मीरमधून पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याची बातमी समोर आली आहे. यावेळी हा हल्ला शोपियानमध्ये झाला आहे. इथे दहशतवादांनी एका नागरिकाला लक्ष केलं व गोळीबार केला. त्यानंतर या नागरीकाला झैनपोरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    पोलिसांनी सांगितले की, संशयित दहशतवाद्यांनी चित्रगाममध्ये एका व्यक्तीवर गोळीबार केला. त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. प्राथमिक अहवालांनुसार, जखमी व्यक्तीचे नाव जमीर अहमद आहे, आणि ते व्यवसायाने दुकानदार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, हल्लेखोरांना पकडण्यासाठी संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरु आहे.

    दरम्यान, यापूर्वी मंगळवारीही बडगाममध्ये सुरक्षा दलांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात एक नागरिक जखमी झाला असून संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरु आहे.

    दुसरीकडे, कुलगावमध्ये शुक्रवारी दोन दहशतवादी हल्ले झाले ज्यात एक रेल्वे कॉन्स्टेबल शहीद झाला. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांनी शामफोर्ड शाळेजवळ रेल्वे कॉन्स्टेबलवर गोळीबार केला. त्याला गंभीर अवस्थेत जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

    शुक्रवारीच कुलगाममध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला झाला ज्यात एका मजूराचा मृत्यू झाला. हा हल्ला निहामा परिसरात झाल. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, शंकर चौधरी या ३५ वर्षीय बिहारी नागरिकाला निहामा येथून जिल्हा रुग्णालय कुलगाम येथे आणण्यात आला, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.