काँग्रेसचा बडा नेता करणार भाजप प्रवेश; जाणून घ्या सविस्तर

काही महिन्यामध्ये देशातील महत्त्वाच्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मनिपूर आणि उत्तराखंडमध्ये निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष विविध पातळ्यांवर प्रयत्न करत आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तृणमूलच्या अनेक बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

    नवी दिल्ली : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समजत आहे. काँग्रेसचा एक मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी सकाळ.कॉमला दिली आहे. दुपारी एकच्या सुमारास हा नेता भाजपचे कमळ हाती घेणार आहे. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित राहतील. पियुष गोयल हेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. असे असले तरी हा काँग्रेसचा नेता कोण हे समजू शकलेलं नाही. सूत्रांच्या माहितीनुसार हा नेता उत्तर भारतातील एका राज्याशी संबंधित असून तो माजी मंत्री आहे. काँग्रेस नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा हा कार्यक्रम भाजपच्या दिल्ली कार्यालयात पार पडणार आहे.

    काही महिन्यामध्ये देशातील महत्त्वाच्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मनिपूर आणि उत्तराखंडमध्ये निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष विविध पातळ्यांवर प्रयत्न करत आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तृणमूलच्या अनेक बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्यात निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नेमकं कोणत्या काँग्रेस नेत्याचा भाजप प्रवेश होईल, याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. दुपारी १ वाजता हे चित्र स्पष्ट होईल.

    काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या एन्ट्री संदर्भात राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहे. पत्रकारांसह सोशल मीडियावर वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते पक्षश्रेष्ठींवर नाराज असल्याची बातमी समोर येत आहे. त्यातच आता एक मोठा नेता भाजपमध्ये जाणार आहे. त्यामुळे हा नेता नक्की कोण याबाबत उत्सुकता आहे. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आतापासूनच तयारी करत आहे. त्यामुळे हा काँग्रेस नेता उत्तर प्रदेशचा असल्याचा कयास लावला जात आहे.

    one of the north india congress leader will join bjp today