पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान लोकसभेत विरोधकांचा गदारोळ

संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. 19 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला नव्या सदस्यांना शपथ देण्यात आली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या मंत्र्यांचा परिचय देण्यासाठी उभे राहिले. त्यानंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत घोषणाबाजी सुरु केली. सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर अवघ्या 8 मिनिटात विरोधकांनी गोंधळाला सुरु झाली. विरोधकांनी एकच गदारोळ सुरु केल्यामुळे, लोकसभा अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज पहिल्याच दिवशी, पहिल्याच सत्रात दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं. तिकडे राज्यसभेचं कामकाजही 12:24 पर्यंत स्थगित करण्यात आलं.

  नवी दिल्ली : संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. 19 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला नव्या सदस्यांना शपथ देण्यात आली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या मंत्र्यांचा परिचय देण्यासाठी उभे राहिले. त्यानंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत घोषणाबाजी सुरु केली. सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर अवघ्या 8 मिनिटात विरोधकांनी गोंधळाला सुरु झाली.

  दरम्यान त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, काही लोकांना महिला, दलित आणि शेतकरी मंत्री झालेले बघवत नाही, त्यामुळेच विरोधक गोंधळ घालत आहेत. मोदी म्हणाले, ‘ मला वाटलं आज सभागृहात उत्साहाचं वातावरण असेल. मोठ्या संख्येत महिला, दलित, आदिवासी, शेतकरी कुटुंबातील खासदार आता मंत्री झाल्याने आनंदाचं वातावरण असेल. त्यांचा परिचय करुन देणं आनंदाचं होतं, मात्र काहींना दलित, महिला, ओबीसी, शेतकरी पुत्र मंत्री झालेले रुचले नाही. त्यामुळेच त्यांनी परिचय करु दिला नाही’

  विरोधकांनी एकच गदारोळ सुरु केल्यामुळे, लोकसभा अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज पहिल्याच दिवशी, पहिल्याच सत्रात दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं. तिकडे राज्यसभेचं कामकाजही 12:24 पर्यंत स्थगित करण्यात आलं.

  मोदी काय म्हणाले?

  आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीडियाशी संवाद साधला. कोरोनाची लस घ्या आणि बाहुबली बना, असं आवाहन देशवासियांना करतानाच संसदेत कळीचे प्रश्न विचारा. पण उत्तरं देण्याची सरकारला संधीही द्या, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना केलं.

  दरम्यान पावसाळी अधिवेशनात 2 आर्थिक विधेयकांसह एकूण 31 विधेयकं मांडली जाणार आहेत. 13 ऑगस्टपर्यंत सभागृहाचं कामकाज नियोजित आहे. काँग्रेस खासदार मनिष तिवारी लोकसभेत कृषी कायद्यांविरोधात स्थगन प्रस्ताव देणार आहेत. शेतकरी आंदोलनावरुन काँग्रेससह विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. मात्र गदारोळात सभागृहाचं कामकाज वाया जाऊ नये, असं आवाहन सत्ताधारी भाजपकडून केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजे 20 जुलैला कोरोनावर निवेदन देणार आहेत. देशातील कोरोनाची सद्यस्थिती, लसीकरण मोहीम, उद्योग धंदे वगैरेवर मोदी सरकारची बाजू मांडतील.