मोदींच्या वाढदिवसानिमित्त ‘या’ कार्यक्रमांचं आयोजन; रोजगाराच्या संदर्भात तरुणांचा खोचक सल्ला

कोरोना विषाणूच्या कालावधीमध्ये संपूर्ण देशभर लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे लाखो लोकांचे रोजगार गेले असून देशातील बेरोजगारांची संख्या वाढल्याचे चित्र दिसत आहे. त्यात मोदी सरकारने दिलेली आश्वासनांची आठवण करुन देत अनेकांनी #राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस हा हॅशटॅग वापरुन मोदी सरकारला प्रश्न विचारले आहेत.

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा आज ७० वा वाढदिवस (Happy Birthday) आहे. मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १४ सप्टेंबरपासून भाजप (BJP) एक आठवड्याचं सेवा कार्य करत आहे. राष्ट्रीय स्तरापासून राज्य (State) , जिल्हा (District)  आणि तालुका (Taluka) स्तरावर सेवा कार्य केले जात आहे. त्यामुळे या वर्षी मोदींचा वाढदिवस हा सेवा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन (Organizing events on the occasion)  केलं जाणार आहे. ७० ठीकाणी ७० कार्यक्रम करण्याचा निश्चय भाजपाने केला आहे. तर दुसरीकडे भाजपाच्या विरोधकांनी मोदींचा वाढदिवस हा राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला सोशल नेटवर्किंगवर तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांकडून दुपारी १२ वाजता एक व्हर्च्युअल कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२.३० वाजता केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह, डॉ जितेंद्र सिंह आणि भाजप खासदार मनोज तिवारी विविध सामाजिक संघटनांच्या मदतीने पाकिस्तानहून आलेल्या हिंदू शरणार्थींना मजलिस पार्क कॅम्प, आदर्श नगर, नवी दिल्लीत शिलाई मशीन, ई-रिक्षा आणि जेवणाच्या वस्तूंचं वितरण करतील. तर नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाआधी तामिळनाडूच्या भाजप कार्यकर्त्यांनी ७० किलोंचा लाडू श्री कामाक्षी अम्मन मंदिरात अर्पण केला. त्यानंतर तो कोईंबतूरमधील लोकांना वाटला.

कोरोना विषाणूच्या कालावधीमध्ये संपूर्ण देशभर लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे लाखो लोकांचे रोजगार गेले असून देशातील बेरोजगारांची संख्या वाढल्याचे चित्र दिसत आहे. त्यात मोदी सरकारने दिलेली आश्वासनांची आठवण करुन देत अनेकांनी #राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस हा हॅशटॅग वापरुन मोदी सरकारला प्रश्न विचारले आहेत. भाषण नको रोजगार द्या, दाढी नाही रोजगार वाढवा, ते दोन कोटी रोजगार कुठे गेले ज्याबद्दल तुम्ही आश्वासन दिलेलं असे अनेक मुद्दे सोशल मीडियावर मांडण्यात आले आहेत. #राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस या हॅशटॅगवर अवघ्या काही तासांमध्ये दोन लाख २८ हजार ट्विट करण्यात आले आहेत.

ट्विटवरुन मिम्सचाही पडला पाऊस :