ओरिसाच्या सुताराची कमाल…आधी बनविली लाकडी पाने आणि त्यानंतर त्यावर कोरली संपूर्ण हनुमान चाळिसा ; पाहा फोटो

व्यवसायाने सुतार असलेले अरुण यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत . गेल्या वर्षी त्यांनी विविध गोष्टी साकारल्या आहेत. तर यावर्षी त्यांनी हिंदी अक्षरे लाकडात कोरत हनुमान चाळिसा सारखे पुस्तके कोरली आहेत.लाकडावर अशी बारीक कारागिरी करून हनुमान चाळिसा लिहिणे फार मोठी गोष्ट आहे, म्हणून सर्वजण अरुणचे कौतुक करत आहेत. अरुणने सांगितले की त्यांनी या हनुमान चाळिसाच्या दोन प्रती तयार केल्या आहेत.

    कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊनची स्थिती आहे. अनेकांनी या लॉकडाऊनमध्ये विविध कला आत्मसात केल्या तर काहींनी नवनवीन काही शिकण्याचा प्रयत्न केल. या संकट काळात बर्‍याचजणांनी घरात रिकाम्या बसण्या ऐवजी नवीन काही प्रयोग केलेआणि स्वतःची प्रतिभा जगासमोर आणली आहे. यामध्ये ओडिशाच्या अरुण साहूचाही समावेश आहे.

    लाकडात कोरले हनुमान चाळिसा

    ओडिशाच्या गंजम जिल्ह्यात राहणाऱ्या अरुण साहू या सुताराचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. कांताई कोळी गावातील सुतार अरुण साहू यांनी लाकडात हनुमान चाळिसा तयार केली आहे.यासाठी आधी त्यांनी लाकडी पुस्तक बनविले. याबाबत बोलताना अरुण म्हणाले, ‘जवळपास दोन वर्षांपासून आपल्या देशात लॉकडाऊन आहे.मी घरी रिकामं बसून होतो. या काळात असे वाटले की काहीतरी केले पाहिजे.आणि या विचारातूनच अचानक मला लाकडात हनुमान चाळिसा बनवण्याची कल्पना सुचली.

    पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना भेट देण्याचा मानस

    व्यवसायाने सुतार असलेले अरुण यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत . गेल्या वर्षी त्यांनी विविध गोष्टी साकारल्या आहेत. तर यावर्षी त्यांनी हिंदी अक्षरे लाकडात कोरत हनुमान चाळिसा सारखे पुस्तके कोरली आहेत.लाकडावर अशी बारीक कारागिरी करून हनुमान चाळिसा लिहिणे फार मोठी गोष्ट आहे, म्हणून सर्वजण अरुणचे कौतुक करत आहेत. अरुणने सांगितले की त्यांनी या हनुमान चाळिसाच्या दोन प्रती तयार केल्या आहेत. त्यांची एक प्रत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि दुसरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यायची आहे. तसेच त्यांच्या गावात एकही संग्रहालय नसून गंजम जिल्ह्यात एक संग्रहालय हवे आहे असा मानस त्यांनी व्यक्त केला.