देशातील सहा राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढला, पक्ष्यांचा अचानक मृत्यू

केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि गुजरात या सहा राज्यांनी (Six States) कृती योजनांद्वारे प्रादुर्भाव नियंत्रणात (Control is Most Important) आणावा, अशी सूचनाही केंद्र सरकारने केली आहे. केरळच्या दोन बाधित जिल्ह्यांमधील कत्तल प्रक्रिया पूर्ण झाली असून तिथे निर्जंतुकीकरण सुरू आहे, असे एका अधिकृत निवेदनामध्ये म्हटले आहे.

देशातील सहा राज्यांत बर्ड फ्लूचा (Bird Flu) प्रादुर्भाव झाल्यामुळे केंद्र सरकारच्या (Central Government) वतीने स्पष्ट करण्यात आले आहेत. केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि गुजरात या सहा राज्यांनी (Six States) कृती योजनांद्वारे प्रादुर्भाव नियंत्रणात (Control is Most Important) आणावा, अशी सूचनाही केंद्र सरकारने केली आहे. केरळच्या (Kerala) दोन बाधित जिल्ह्यांमधील कत्तल प्रक्रिया पूर्ण झाली असून तिथे निर्जंतुकीकरण सुरू आहे, असे एका अधिकृत निवेदनामध्ये म्हटले आहे.

ज्या राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झालेला नाही त्यांना, पक्ष्यांचा अचानक मृत्यू झाल्याचे आढळल्यास त्याची त्वरित माहिती द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. केरळ, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या बाधित राज्यांमध्ये केंद्राची पथके पाठविण्यात येणार आहेत. हरियाणातील पंचकुला जिल्हयात काही पक्ष्यांचे नमुने घेतले असता बर्ड फ्लू झाल्याचे निष्पन्न झाल्याने एक लाख ६० हजार कोंबडय़ांची कत्तल करावी लागणार आहे, असे राज्याचे कृषी मंत्री जे.पी. दलाल यांनी सांगितले.

केरळातून आधी ज्या वाहनांनी कोंबडया आणण्यात आल्या, ती वाहने निर्जंतुक करण्यात येणार आहे. छत्तीसगडमधील बलोड जिल्हयात चार कावळे मृतावस्थेत सापडले असून त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.