देशात कोरोनाचा कहर, मागील २४ तासांत ७६ हजार ४७२ नवे कोरोनाबाधित रूग्ण

आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry ) दिलेल्या माहितीनुसार, देशात ७ लाख ५२ हजार ४२४ ॲक्टिव्ह रुग्ण (active cases)  आहेत. तर २६ लाख ४८ हजार ९९९ जण कोरोनामुक्त (cured) झाले आहेत. मात्र, आतापर्यंत ६२ हजार ५५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ३४ लाख ६३ हजार ९७३ वर पोहचली आहे.

देशात कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात तब्बल ७६ हजार ४७२ नवे कोरोनाबाधित ( new cases)  रूग्ण आढळून आले आहेत. तर १ हजार २१ रुग्णांचा मृत्यू (deaths in the last 24 hours) झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३४ लाखांच्या (crosses 34 lakh) वर गेला आहे.

आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry ) दिलेल्या माहितीनुसार, देशात ७ लाख ५२ हजार ४२४ ॲक्टिव्ह रुग्ण (active cases)  आहेत. तर २६ लाख ४८ हजार ९९९ जण कोरोनामुक्त (cured) झाले आहेत. मात्र, आतापर्यंत ६२ हजार ५५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ३४ लाख ६३ हजार ९७३ वर पोहचली आहे.

जगभरातील कोरोनाबाधितांच्या एकूण मृत्यूंच्या संख्येत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. मागील काही दिवसांपासून देशात दररोज ५० ते ६० हजारांच्या वर कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अमेरिकेत कोरोनामुळे १ लाख ८५ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर ब्राझीलमध्ये १ लाख १९ हजार जणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.