लॉकडाऊनमुळे उद्धवलेल्या परिस्थितीने घेतला ३०० पेक्षा जास्त लोकांचा बळी

नवी दिल्ली: कोरोनाला आळा घालण्यासाठी असलेल्या लॉकडाऊनच्या काळात भारतात ३०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाचे कोणतेही संक्रमण या लोकांना झाले नव्हते. मात्र

 नवी दिल्ली: कोरोनाला आळा घालण्यासाठी असलेल्या लॉकडाऊनच्या काळात भारतात ३०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू  झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाचे कोणतेही संक्रमण या लोकांना झाले नव्हते. मात्र लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या समस्यांनी ३०० हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात आज मालगाडी खाली येऊन १६ जणांचा मृत्यू झाला आहे. याआधीही अनेकांचा लॉकडाऊनमुळे आलेल्या समस्येने जीव घेतला आहे. या संदर्भात करण्यात आलेल्या पाहणीनुसार  १९ मार्चपासून २ मे पर्यंत ३३८ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.यात ८० लोक असेही होते ज्यांनी आत्महत्या केली. त्यानंतर लॉकडाऊनमुळे जीव गेलेल्यांमध्ये प्रवासी मजुरांची संख्या जास्त आहे. लॉकडाऊनमुळे ते चालत आपले घर गाठण्यासाठी निघाले होते. विविध रस्ते अपघातांमध्ये ५१ मजुरांचा मृत्यू झाला आहे. तसेच दारू न मिळाल्याने अन्य गोष्टींचे सेवन करून ४५ आणि अन्न, पैसे न मिळाल्याने ३६ जणांचा मृत्यू झाला आहे.