AIMIM चं ट्वीटर हॅंडल हॅक

हॅकर्सकडून अकाउंटवर आतापर्यंत कोणतेही ट्विट केले गेले नाही. या अकाउंटचे 688.3K फॉलोअर्स असून येथे पक्षाच्या कार्यासंबंधित माहिती दिली जाते. ओवेसींच्या पक्षाचे हे ट्विटर अकाउंट खूपच सक्रिय आहे. पक्षाचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्यानंतर एमआयएमच्या उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष शौकत अली यांचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले होते. हे अकाऊंट काही वेळासाठी बंद ठेवण्यात आले होते, आता ते सुरू करण्यात आले आहे.

  असदुद्दीन ओवैसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले आहे. ट्विटर अकाउंट हॅक करून हॅकर्सनी जगातील दुसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांचा फोटो डीपीवर लावला आणि त्या अकाउंटचे नाव देखील बदलले आहे.

  कोण आहेत एलोन मस्क?

  स्पेसएक्सचे संस्थापक आणि टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांचा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये दुसरा क्रमांक आहे. असं म्हणतात की, एलोन प्रत्येक सेकंदाला सुमारे 70 लाख रुपये कमावतात. मस्क आता अंतराळात पाऊल टाकणार आहेत. इलोन मस्क यांची टेस्ला ही जगातील प्रथम क्रमांकाची इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी आहे. या कंपनीने अलीकडेच भारतात देखील आपले कार्यालय सुरू केले आहे.

  हॅकर्सकडून अकाउंटवर आतापर्यंत कोणतेही ट्विट केले गेले नाही. या अकाउंटचे 688.3K फॉलोअर्स असून येथे पक्षाच्या कार्यासंबंधित माहिती दिली जाते. ओवेसींच्या पक्षाचे हे ट्विटर अकाउंट खूपच सक्रिय आहे.

  खासदार ओवेसी शुक्रवारी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होते. त्यांचे स्वागत करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर त्यांनी हा दौरा केला होता असे म्हटले होते.

  दरम्यान, पक्षाचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्यानंतर एमआयएमच्या उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष शौकत अली यांचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले होते. हे अकाऊंट काही वेळासाठी बंद ठेवण्यात आले होते, आता ते सुरू करण्यात आले आहे.