अखिलेश यादवच्या बालेकिल्ल्यात ओवेसी करणार शंखनाद

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यांचा बालेकिल्ला असलेल्या आझमगढ येथून ते निवडणुकीचा बिगूल वाजविणार आहेत.

  • १२ वेळा रोखले, कार्यक्रम रद्द केले होते - ओवेसींचा अखिलेशवर हल्लाबोल

वाराणसी. अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे (एआयएमआयएम) चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी पूर्वांचलच्या दौऱ्यावर आहेत. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यांचा बालेकिल्ला असलेल्या आझमगढ येथून ते निवडणुकीचा बिगूल वाजविणार आहेत. वाराणसीत दाखल होताच ओवेसी यांनी अखिलेश यादव यांच्यावर हल्लाबोल केला. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव सरकार असताना त्यांनी मला १२ वेळा राज्यात येण्यापासून रोखले आणि २८ वेळा राज्यात आमच्या कार्यक्रमास परवानगी नाकारली होती, अशा शब्दात हल्लाबोल केला.

बालेकिल्ल्यात करणार शंखनाद
अखिलेश यादव यांचा बालेकिल्ला असलेल्या आजमगडमध्ये ओवेसी निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी कार्यकर्त्यांसमवेत भेट घेणार आहेत. यानंतर त्याचा मऊ येथेही एक कार्यक्रम आहे. सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (एसबीएसपी) राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी कॅबिनेट मंत्री ओम प्रकाश राजभर हेही त्यांच्यासमवेत होते. उल्लेखनीय असे की, लीकडेच ओवेसींच्या पक्षाने राजभर यांच्या पक्षासोबत युती केली आहे.

मशिदीत नाज, मदरशात चहा डिप्लोमसी
उत्तर प्रदेशात निवडणुकांना सव्वा वर्षाचा कालावधी शिल्लक असला तरी राजकीय पक्षांनी मात्र आतापासूनच तयारी सुरू केली आहे. आझमगढध्ये दाखल होण्यासाठी वाराणसी ते जौनपूर हा जो मार्ग ओवेसींनी निवडला तो पूर्णत: यादव आणि मुस्लिमांचे प्राबल्य असलेला भाग आहे. ओवेसींनी दुपारी जोहरचे नमा पठण जौनपूरमधील प्रसिद्ध गुरैनी मदरशात केले. येथेच त्यांनी चहा सुद्धा घेतला.