vaccine corona virus

ऑक्सफर्डच्या (AZD1222) लसीची तिसरी आणि अंतिम टप्प्यातील चाचणी रोखण्यात आली आहे. ब्रिटनमधील एका व्यक्तीला ऑक्सफर्डची कोरोना लस देण्यात आली होती. मात्र ही व्यक्ती आजारी पडल्यानंतर कोरोना लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी रोखण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

ॲस्ट्राझेनेका(AstraZeneca) आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या (Oxford covid-19 Vaccine) कोरोनावरील लस रोखण्यात आली आहे. कोरोना विषाणूचे संकट रोखण्यासाठी सर्वात जास्त अपेक्षा असणाऱ्या ऑक्सफर्डच्या (AZD1222) लसीची तिसरी आणि अंतिम टप्प्यातील चाचणी रोखण्यात आली आहे. ब्रिटनमधील एका व्यक्तीला ऑक्सफर्डची कोरोना लस देण्यात आली होती. मात्र ही व्यक्ती आजारी पडल्यानंतर कोरोना लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी रोखण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

जागतिक आरोग्य संघटना(WHO)च्या मते, जगातील इतर लसींच्या चाचण्यांच्या तुलनेत हे आघाडीवर होते. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या लसीकडे भारतासह अनेक देशांचे लक्ष लागून आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी मार्केटमध्ये पहिले स्थान मिळवेल, अशी आशा आहे. तसेच तज्ज्ञांचेही मत आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रवक्त्याने सांगितले की, मोठ्या चाचणीत आजारी पडण्याची सर्व शक्यता आहे, परंतु काळजीपूर्वक तपासणी करण्यासाठी स्वतंत्र तपासणी करणे फार महत्त्वाचे आहे. तसेच ऑक्सफोर्ड विद्यापीठात कोरोना व्हायरस लसीची चाचणी थांबविण्याची ही दुसरी वेळ आहे.