pakistan firing at loc two young martyrs
एलओसीवर पाकचा गोळीबार; दोन सैनिक हुतात्मा

पाकिस्तानने कुपवाडा जिल्ह्यातील नौगाम विभागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत गुरुवारी सकाळी गोळीबारासोबत उखळी तोफांचा मारा केला.

श्रीनगर : पाकिस्तानी सैनिकांनी (Pakistan Soldiers) गुरुवारी कुपवाडा (kupwara) जिल्ह्यांत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत (loc) गोळीबारापाठोपाठ तोफगोळ्यांनी केलेल्या माऱ्यात भारतीय लष्कराचे दोन सैनिक हुतात्मा झाले.

Firing At Loc

पाकिस्तानने कुपवाडा जिल्ह्यातील नौगाम विभागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत गुरुवारी सकाळी गोळीबारासोबत उखळी तोफांचा मारा केला. यात दोन सैनिक हुतात्मा झाले, तर अन्य चार जण जखमी झाले. जखमी सैनिकांना उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

भारतीय सैनिकांनी पलटवार करून पाकिस्तानच्या गोळीबाराला तडाखेबाज उत्तर दिले. केरान आणि मछील विभागातही पाकिस्तानने गोळीबार केला, असे श्रीनगरस्थित संरक्षण प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले.