The government is not ready to discuss directly with the farmers

लोकांची दिशाभूल करत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चात गोंधळ घालण्यासाठी १३ जानेवारी ते १८ जानेवारी दरम्यान पाकिस्तानातून जवळपास ३०० ट्विटर हॅण्डल्स तयार करण्यात आली आहेत. याबद्दल इतर यंत्रणांकडून माहिती मिळाली आहे.

नवी दिल्ली :  दिल्लीच्या वेशीवर शेतकरी आंदोलन सुरू असून आज (सोमवार) ६० दिवस पूर्ण झाले आहेत. तसेच शेतकरी आंदोलनात गोंधळ घालण्यासाठी प्रजासत्ताक दिनी काढण्यात येणाऱ्या मोर्चावर कच रचण्यात आला होता. परंतु आरोपीला पकडले असून हा कट उधळून लावण्यात आला आहे. परंतु ट्रॅक्टर मोर्चा हायजॅक करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पाकिस्तानमधील ३०० ट्विटर हॅण्डल्सची माहिती सापडली असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे.

ट्रॅक्टर मोर्चाबद्दल माहिती देताना विशेष पोलीस आयुक्त दीपेंद्र पाठक यांनी प्रजासत्ताक दिनाचं सेलिब्रेशन संपल्यानंतर कडक सुरक्षेत ट्रॅक्टर मोर्चा काढला जाईल असं सांगितलं आहे. लोकांची दिशाभूल करत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चात गोंधळ घालण्यासाठी १३ जानेवारी ते १८ जानेवारी दरम्यान पाकिस्तानातून जवळपास ३०० ट्विटर हॅण्डल्स तयार करण्यात आली आहेत. याबद्दल इतर यंत्रणांकडून माहिती मिळाली आहे. तसेच पाकिस्तानमधील ३०८ ट्विटर हॅण्डल्स Farmer Protest, Tractor Rally संबंधित हॅशटॅगचा सतत वापर करत आहेत, अशी माहिती समोर आली आहे.