
व्हिडिओ पालकांकडून चुकून शेअर झाला असल्याचं सांगण्यात आलं. तर, काही शाळांमधून अशाच प्रकारच्या तक्रारी आल्यानंतर उत्तर दिल्ली महापालिकेने अशा पालकांना सावधानतेचा इशारा दिला आहे आणि अशी चूक पुन्हा झाल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची तंबीही दिली आहे.
दिल्ली : सध्या कोरोना महामारीमुळे (corona) मुलांचं घरूनच ऑनलाइन शिक्षण (online education) सुरू आहे. यामुळे शाळेतल्या शिक्षकांनी प्रत्येक वर्गाचे WhatsApp ग्रुप केले आहेत. याचा उद्देश हाच आहे की, मुलांना माहिती देणं. दिल्लीतील (Delhi) एका मुलाच्या पालकांनी ऑनलाइन क्लासच्या WhatsApp group ग्रुपमध्ये अश्लील व्हिडिओ (पॉर्न) शेअर केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
हा व्हिडिओ पालकांकडून चुकून शेअर झाला असल्याचं सांगण्यात आलं. तर, काही शाळांमधून अशाच प्रकारच्या तक्रारी आल्यानंतर उत्तर दिल्ली महापालिकेने अशा पालकांना सावधानतेचा इशारा दिला आहे आणि अशी चूक पुन्हा झाल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची तंबीही दिली आहे.
हिंदुस्तान टाइम्सच्या एका अहवालानुसार, जहांगीरपुरीमध्ये एका शाळेच्या मुख्याध्यापकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, आम्हाला गेल्याच महिन्यात इयत्ता ५ वीच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये एक अश्लील व्हिडिओ क्लिप मिळाली होती. ही क्लिप विद्यार्थ्याच्या नोंदणीकृत मोबाइलवरून पाठविण्यात आली होती. आम्ही या विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलवून घेतलं,तथापि त्यांनी अशा प्रकारचा व्हिडिओ पाठविलाच नसल्याचं सांगितलं.
आमचे शिक्षक शाळेने तयार केलेल्या ग्रुपमध्ये सातत्याने मेसेजेस पाठवत असतात. ऑनलाइन क्लासेस संबंधी असलेल्या मेसेजशिवाय अन्य कोणतेही मेसेजेस ग्रुपमध्ये शेअर करू नयेत असं पालकांनाही सांगितलं असल्याची माहिती या मुख्याध्यापकांनी दिली. आता आम्ही शिक्षण विभागाने जारी केलेला अध्यादेशच प्रत्येक ग्रुपमध्ये शेअर केला आहे असंही त्यांनी नमूद केलं.
शाळेने तयार केलेल्या ग्रुपमध्ये अश्लील मेसेज पोस्ट करणे आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासासंबंधी तयार केलेल्या ग्रुपमध्ये पॉर्न व्हिडिओ आणि फोटो प्रसारित झाल्यानंतर, उत्तर दिल्ली महापालिकेने अशा प्रकारच्या कृत्यासाठी जबाबदार असल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
उत्तर दिल्ली महानगरपालिका संस्थेच्या शिक्षण विभागाने नरेला झोनमधील एका शाळेची तक्रार आल्यानंतर हा इशारा दिला आहे. “अशा प्रकारची पुनरावृत्ती झाल्यास आरोपी पालकांवर कोणत्याही प्रकारची हयगय न करता गुन्हा दाखल करावा,” असे महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.