Twitter/@meeracomposes
Twitter/@meeracomposes

गुरुवारी, २६ ऑगस्ट रोजी त्यांनी बॅनरचा एक फोटो ट्विट केला आणि लिहिले, हैदराबाद में इंदिरा पार्क मैनेजमेंट द्वारा भद्दी और नए स्तर की मोरल पुलिसिंग! सार्वजनिक पार्क हे परस्पर संमतीने येणाऱ्या सर्व लिंगांच्या जोडप्यांसह सर्व नागरिकांचे ठिकाण आहे. पार्कात प्रवेश करण्यासाठी 'विवाहित' असण्याची अट कशी लावली जाऊ शकते!

  अविवाहित जोडप्यांना नो एंट्री

  Twitter/@meeracomposes

  हैदराबादच्या डोमलगुडा येथील एका पार्कबाहेरचा बॅनर चर्चेचा विषय बनला आहे. या बॅनरवर लिहिले आहे-अविवाहित जोडप्यांना उद्यानात प्रवेश करण्याची परवानगी नाही. ‘न्यूज मिनिट’च्या अहवालानुसार, इंदिरा पार्क व्यवस्थापनाने हा बॅनर तेथे लावला होता. असे दिसते की, तरुण जोडप्यांमधील कोणत्याही प्रकारची जवळीक टाळण्यासाठी हे पाऊल उचलले गेले. मात्र, बॅनरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर व्यवस्थापनाने बॅनर काढून टाकला आणि लोकांनी त्यावर जोरदार टीका केली. ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेने (जीएचएमसी) स्पष्टीकरण दिले आहे की बॅनर खालच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या माहितीशिवाय लावण्यात आले होते.

  काय आहे प्रकरण?

  कार्यकर्त्या मीरा संघमित्रा यांनी ही बाब समोर आणली होती. खरं तर, गुरुवारी, २६ ऑगस्ट रोजी त्यांनी बॅनरचा एक फोटो ट्विट केला आणि लिहिले, हैदराबाद में इंदिरा पार्क मैनेजमेंट द्वारा भद्दी और नए स्तर की मोरल पुलिसिंग! सार्वजनिक पार्क हे परस्पर संमतीने येणाऱ्या सर्व लिंगांच्या जोडप्यांसह सर्व नागरिकांचे ठिकाण आहे. पार्कात प्रवेश करण्यासाठी ‘विवाहित’ असण्याची अट कशी लावली जाऊ शकते! त्यांनी GHMC चे महापौर जी. विजयालक्ष्मीला टॅग करत लिहिले – हे असंवैधानिक आहे.

  ओ-विन ॲप तयार करायला पाहिजे!

  या प्रकरणी वरुण ग्रोव्हरने लिहिले-उद्यानात जाणाऱ्या विवाहित जोडप्यांच्या पुष्टीकरणासाठी ॲप का बनवू नये. त्याला O-Win म्हणता येईल.

  लग्नाचे प्रमाणपत्रही छापून घ्यावे लागेल!

  बॅचलरही लिहिलं असतं तर…

  जेव्हा हटविला बॅनर…


  बरीच टीका झाल्यानंतर, GHMCने ट्विट केले की, ‘बॅनर डीडी युबीडीने काढले आहे. गैरसोयीबद्दल क्षमस्व. पार्कात शांतता राखण्यासाठी स्थानिक पोलिसांना नियमित गस्तीसाठी सांगण्यात आले आहे. जरी बॅनर काढण्यात आले असले तरी. परंतु अशा स्थितीत प्रश्न उरतोच की, अशा प्रकारचा बॅनर कोणाच्या परवानगीने लावण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करण्याची लोक मागणी करत आहेत.