पेगॅसस स्पायवेअर प्रकरणावरुन दोनही सभागृहात गदारोळ | LIVE update : गोंधळामुळे लोकसभा दुपारी अडीचपर्यंत, राज्यसभा १ पर्यंत तहकूब | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
लाईव ब्लॉग
अंतिम अपडेट10 दिन पहले

LIVE update : गोंधळामुळे लोकसभा दुपारी अडीचपर्यंत, राज्यसभा १ पर्यंत तहकूब

ऑटो अपडेट
द्वारा- Kaustubh Khatu
13:53 PMJul 20, 2021

राज्य सभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांचं भाषण

अनेकांनी आपला परिवार गमावला तर काहिंनी आपला रोजगार गमावला पण यावर सरकारने कोणतेही भाष्य केलं नाही.

जाहिरातबाजी करण्यात सरकार माहिर 

गंगा किनारी पुरलेले मृतदेह इतिहास लक्षात ठेवेल 

सरकार खोटी आकडेवारी देतंय 

 

जो लोग चले गये वो लोग मुक्त हो गयेअसं RSS प्रमुख म्हणाले होते. यावरुन संघाची मनीशा दिसुन येते.

13:40 PMJul 20, 2021

राज्य सभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या भाषणाला सुरुवात

सभागृहात चार सदस्यांनी माझ्यासमोर येवून गदारोळ केला आणि सभागृहाचे उपाध्यक्ष असूनही तुम्ही गप्प होतात. हा माझा अपमान आहे. असं म्हणत कॉंग्रेस खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी खंत व्यक्त केली आहे.

कोरोना वॉरीयरला वाहिली श्रध्दांजली

13:10 PMJul 20, 2021

विरोधकांचा गदारोळ

विरोधकांकडून राज्यसभेत पेगॅसस स्पायवेअर प्रकरणावरुन 'आम्हाला न्याय द्या' अशा घोषणा दिल्या जात आहेत.

सभागृहाच्या उपसभापतींचे शांततेचे आवाहन

13:03 PMJul 20, 2021

राज्य सभेच्या कामकाजाला सुरुवात

सभागृह नेते पीयूश गोयल यांनी केलं शांतेचं आवाहन

12:06 PMJul 20, 2021

राज्यसभेचं कामकाज १ वाजेपर्यंत तहकूब

विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज १ वाजेपर्यंत तहकूब

१ वाजता कोविड संदर्भातील विवीध मुद्द्यांवर प्रश्नोत्तरांचा तास

12:03 PMJul 20, 2021

राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात

प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात. 

विरोधकांचा गदारोळ.

उपसभापतींनी केलं शांततेचं आवाहन

12:01 PMJul 20, 2021

पेगासस गोंधळावरून लोकसभेचे कामकाज दुपारी अडीचपर्यंत तहकूब

पेगासस स्नूपिंग वादावरून विरोधी पक्षातील खासदारांनी गदारोळ केल्यानंतर लोकसभेचं कामकाज दुपारी  अडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.

11:59 AMJul 20, 2021

राज्यसभेचे कामकाज तहकूब

विरोधकांच्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.

11:57 AMJul 20, 2021

खासदार माणिकम टागोर यांनी लोकसभेमध्ये मांडला प्रस्ताव

कॉंग्रेसचे खासदार माणिकम टागोर यांनी लोकसभेमध्ये पेगासस विषयावर चर्चा करण्यासाठी स्थगिती प्रस्ताव मांडला

11:55 AMJul 20, 2021

कॉंग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी पेगासस विषयावर चर्चा करण्यासाठी न्यायालयीन ठराव मांडला

कॉंग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी पेगाससच्या मुद्दय़ावर चर्चेसाठी लोकसभेचे कामकाज थांबविण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

Load More

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवसही पेगॅसस स्पायवेअर प्रकरणामुळे गाजला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी सभागृहात केली व गदारोळ झाला. सभागृहातील या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी २:३० वाजेपर्यंत तर राज्यसभेचं कामकाज १२ पर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
दिनदर्शिका
३० शुक्रवार
शुक्रवार, जुलै ३०, २०२१

एखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...
Advertisement
Advertisement
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.